महाराष्ट्रातील एकमेव लालपरी बस सेवा जी तुम्हाला घेऊन जाते थेट उज्जैनला. प्रतिनिधी ✍️ दुर्गेश गायकवाड
प्रतिनिधी ✍️ दुर्गेश रमेश गायकवाड

रविवार, दि ०८ मार्च २०२६
मनात श्रद्धा आणि डोळ्यात उत्सुकता असेल तर प्रवासही एक अनुभव बनतो.
तुम्हालाही जायचे आहे का विदर्भातून महाकालेश्वर च्या नगरीत उज्जैनला.
तेही आपल्या विश्वासाची ओळख असलेल्या लालपरीतून.
दररोज सकाळी ७:०० वाजून ४५ मिनिटांनी शेगाव बस स्थानकातून ही लाल परी आपल्या प्रवासाला सुरुवात करते.
आणि ठीक ६:०० वाजून ३० मिनिटाला तुम्हाला पोहोचवते महाकालाच्या चरणी.
खामगाव, मलकापूर, मुक्ताईनगर, बुऱ्हानपूर आणि इंदोर या मार्गाने जात ही बस उज्जैनला पोहोचवते.
या प्रवासाचे पूर्ण टिकीट आहे 556 रुपये.
या बसचे तपशील खालील प्रमाणे दिलेले आहेत.
शेगावहून निघण्याची वेळ:- ०७:४५
खामगावहून निघण्याची वेळ:- ०८:१५
नांदुरा येथून निघण्याची वेळ:- ०८:४५
मलकापूरहून निघण्याची वेळ:- ०९:३०
मुक्ताईनगरहून निघण्याची वेळ:- १०:३०
खंडवा येथून निघण्याची वेळ:- १३:३५
सनावदहून निघण्याची वेळ:- १५:००
इंदूरहून निघण्याची वेळ:- १६:५५
उज्जैन येथे आगमन वेळ:- १८:२०
उज्जैनहून निघण्याची वेळ:- ०५:४५
इंदूरहून निघण्याची वेळ:- ०७:२०
सनावदहून निघण्याची वेळ:- NA
खंडवा येथून निघण्याची वेळ:- १०:३५
मुक्ताईनगरहून निघण्याची वेळ:- १३:५०
मलकापूरहून निघण्याची वेळ:- १४:४५
नांदुरा येथून निघण्याची वेळ:- १५:२५
खामगावहून निघण्याची वेळ:- १६:००
शेगाव येथे आगमन वेळ:- १६:२०
प्रौढांसाठी भाडे (₹). बालभाडे (₹)
शेगाव-उज्जैन ५५१. २७७
शेगाव-इंदूर ४८१. २४२
खामगाव-उज्जैन ५२१. २६२
खामगाव-इंदूर ४५१. २२७
मलकापूर-उज्जैन ४४०. २२१
मुक्ताईनगर-उज्जैन ३८५. १९४
शेगाव-खंडवा ३१८. १६०
खामगाव-खंडवा २८८. १४५
एसटीने प्रवास करून महामंडळाला तुमच्या सेवेची संधी द्या.
कारण एसटीचा प्रवास विश्वासाचा, सुरक्षिततेचा आणि खात्रीचा होय.