Updated by स्टार वन न्युज मराठी ™
29 मार्च 2026
अहिल्यानगर – राहुरी
बेलकरवाडी येथे संत कवी महीपती महाराज यांच्या ६० व्या फिरता नारळी सप्ताहाचा शुभारंभ धर्मध्वज पूजनाने उत्साहात करण्यात आला. हा सोहळा संजय महाराज शास्त्री यांच्या हस्ते संपन्न झाला.

या वेळी महंत अर्जुन महाराज तनपुरे, गुरुवर्य बाळू काका कांबळे, ह.भ.प. नामदेव महाराज, बाळासाहेब बेलकर, बाबासाहेब महाराज वाळुंज, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
हा पवित्र नारळी सप्ताह दिनांक ७ एप्रिल २०२६ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. सप्ताहादरम्यान कीर्तन, प्रवचन, भजन व इतर आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.



