अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

सोबलेवाडीत ‘खेळ पैठणी’चा गुरुवारी जल्लोष कार्यक्रमात महिलांसाठी भरघोस बक्षिसांची रेलचेल आयोजक सुनिताताई सोबले यांची माहिती होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण

सोबलेवाडीत ‘खेळ पैठणी’चा गुरुवारी जल्लोष कार्यक्रमात महिलांसाठी भरघोस बक्षिसांची रेलचेल आयोजक सुनिताताई सोबले यांची माहिती होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण

सोबलेवाडीत ‘खेळ पैठणी’चा गुरुवारी जल्लोष
कार्यक्रमात महिलांसाठी भरघोस बक्षिसांची रेलचेल
आयोजक सुनिताताई सोबले यांची माहिती
होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
पारनेर / प्रतिनिधी दिनांक 3 मार्च
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी येथे गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी महिलांसाठी भव्य ‘हळदी-कुंकू’ समारंभ व ‘न्यू होम मिनिस्टर – खेळ पैठणी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जय जिजाऊ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या नाशिक जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई सोबले यांच्या संकल्पनेतून हा सोहळा साकारत असून, तालुक्यातील महिलांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर यांची उपस्थिती आणि त्यांच्या शैलीत रंगणारा ‘खेळ पैठणी’ हा थरारक उपक्रम. पहिल्या सात विजेत्यांना मानाची पैठणी आणि आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी इलेक्ट्रिक बाईक, द्वितीय क्रमांकासाठी फ्रिज, तर तृतीय क्रमांकासाठी टीव्ही असे बक्षिसांचे स्वरूप आहे. चौथ्या ते सातव्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे शिलाई मशीन, मोबाईल, सोन्याची नथ आणि चांदीचा छल्ला पैठणीसह देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आयोजकांतर्फे आकर्षक साडी भेट दिली जाणार आहे. याशिवाय २१ विविध वस्तूंचा ‘बंपर लकी ड्रॉ’ काढण्यात येणार असून, त्यामध्ये पिठाची गिरणी, स्मार्ट वॉच, मिक्सर, डिनर सेट, इस्त्री, मोबाईल आदी गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे.
हा सोहळा गुरुवारी सायंकाळी ५ वाजता हळदी-कुंकू समारंभाने प्रारंभ होईल. त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत ‘होम मिनिस्टर’चा खेळ रंगणार आहे. कान्हूर-पारनेर रोडवरील खंडोबा मंदिरासमोरील प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित महिला व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
सोबलेवाडी व परिसरातील महिलांनी या नाविन्यपूर्ण व उत्साहवर्धक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सुनिताताई सोबले यांनी केले आहे.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!