नाशिक - मालेगाव

मालेगाव-भाजप नेते किरीट सोमय्यांना माजी नगराध्यक्षांकडून ५ कोटींच्या नुकसान भरपाईची नोटीस

गेली सव्वा वर्षभरापासून गाजत असलेल्या मालेगाव येथील जन्म दाखला घोटाळ्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

Updated by –स्टार वन न्युज मराठी ™ 11 मार्च 2026

Kirit Somaiya

किरीट सोमय्या ( संग्रहित छायाचित्र)/ स्टार वन न्युज मराठी ™ 

नाशिक

मालेगाव: गेली सव्वा वर्षभरापासून गाजत असलेल्या मालेगाव येथील जन्म दाखला घोटाळ्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. मालेगावमधील भाजपचे स्थानिक नेते व माजी नगराध्यक्ष दीपक भोसले यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना ५ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी कायदेशीर नोटीस धाडली आहे. जन्मदाखले रद्द झालेले लोक बांगलादेशी घुसखोर आहेत, असा उल्लेख सोमय्या यांनी केला होता. भोसले यांचा जन्म दाखला देखील रद्द झाला आहे. त्यामुळे आपली सामाजिक व राजकीय बदनामी झाल्याची तक्रार भोसले यांनी या नोटिशीद्वारे केली आहे.

भोसले यांनी या नोटिशीत स्पष्ट केले की, त्यांचा जन्म मालेगाव येथे झाला असून पासपोर्टसाठी त्यांनी कायदेशीर प्रक्रियेद्वारे (जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९६९ च्या कलम १० व १३ नुसार) तहसीलदार कार्यालयाकडून जन्म दाखला मिळवला होता. मात्र, २४ मार्च २०२५ रोजी मालेगाव महानगरपालिकेने हा दाखला एकतर्फी रद्द केला. दरम्यान, गेल्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजी किरीट सोमय्या यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषद घेतली होती. ज्यांचे जन्म दाखले रद्द झाले आहेत ते भारतीय नसून बांगलादेशी, रोहिंग्या किंवा पाकिस्तानी असावेत असा उल्लेख सोमय्या यांनी यावेळी केला होता. तेव्हा पत्रकारांनी दीपक भोसले यांचा देखील जन्मदाखला रद्द झाला, याकडे लक्ष वेधले असता,ज्यांचे जन्म दाखले रद्द झाले त्यांच्याकडे भारतात जन्म झाल्याचा कुठलाच पुरावा आढळून आला नाही, असे स्पष्टीकरण सोमय्या यांनी दिले होते.

 

सोमय्या यांच्या या विधानाला भोसले यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मंगळवारी मालेगाव येथे आलेले नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोर आंदोलन करत मी बांगलादेशी आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर ॲड.संजय शेवाळे यांच्यामार्फत भोसले यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवली आहे. अशा विधानामुळे केवळ त्यांचीच नव्हे तर संपूर्ण भोसले घराण्याची मोठी बदनामी झाली आहे, असे त्यात नमूद केले आहे.

 

 

संपादक ✍️ सचिन रेवगडे 

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!