अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत देखावा; निघोजकरांच्या उत्साहाला उधाण

छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत देखावा; निघोजकरांच्या उत्साहाला उधाण

छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत देखावा; निघोजकरांच्या उत्साहाला उधाण
निघोज – दिनांक 29 मार्च
निघोज येथे सकल हिंदू समाज व श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या भव्य मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराजांचा सादर केलेला जिवंत देखावा नागरिकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला. रविवार (दि. २९) रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पार पडलेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गाव भगव्या रंगात न्हाऊन निघाले.
सुमारे दोन तास चाललेल्या या दिमाखदार मिरवणुकीदरम्यान गावातील विविध पाच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा देखावा सादर करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते अर्जुन आंबेकर व त्यांच्या सहकलाकारांनी साकारलेली भूमिका इतकी प्रभावी होती की, उपस्थित नागरिक अक्षरशः भारावून गेले. संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे जिवंत दर्शन घडवणाऱ्या या देखाव्याला ठिकठिकाणी टाळ्यांचा कडकडाट व घोषणांचा प्रतिसाद मिळत होता.
मिरवणुकीत ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. मळगंगा मंदिर ते ग्रामपंचायत चौक, ते वेश, मारुती मंदिर ते नवी पेठ असा मार्गक्रमण करत मिरवणूक एस.टी. बसस्थानक मार्गे पुन्हा मळगंगा मंदिर येथे दाखल झाली. येथे प्रभू श्रीरामांची महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मिरवणुकीत प्रभू श्रीरामांचा भव्य पुतळा, आकर्षक विद्युत रोषणाई, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय व उत्सवी वातावरणात रंगून गेला होता. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच निघोज व परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत देखावा सादर करण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या भव्य सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन सकल हिंदू समाज समितीचे भिमराव लामखडे, गणेश वराळ, बाळासाहेब जगताप, विलासराव हारदे, ठकाराम गायखे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी केले होते. कार्यक्रमास संदीप पाटील, जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, किशन कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा मळगंगा यात्रा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव लंके, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या मिरवणुकीच्या माध्यमातून निघोजकरांनी धर्म, परंपरा आणि इतिहास यांचा संगम साधत एकात्मतेचा संदेश दिला असून, गावात उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!