अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

अठरापगड जातींच्या रयतेचे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज डॉ. श्रीकांत पठारे यांचे प्रतिपादन

अठरापगड जातींच्या रयतेचे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज डॉ. श्रीकांत पठारे यांचे प्रतिपादन

अठरापगड जातींच्या रयतेचे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज
डॉ. श्रीकांत पठारे यांचे प्रतिपादन
निघोज देवीभोयरे (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) दि.8 मार्च हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातींच्या रयतेचे खरे अर्थाने लोकनायक होते. त्यांनी सर्वधर्मसमभाव जपत शेतकरी, सामान्य रयत तसेच महिलांचा सन्मान राखणारा आदर्श राज्यकारभार उभारला. त्यांच्या कार्यातून लोकहिताचा विचार अग्रस्थानी ठेवणाऱ्या शासनपद्धतीचा आदर्श समाजासमोर उभा राहिला, असे प्रतिपादन पारनेर तालुका शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पठारे यांनी केले.
देवीभोयरे येथे शिवसन्मान प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू तिथीनुसार आयोजित शिवजयंती सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि **‘जय जिजाऊ, जय शिवराय’**च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. मिरवणुकीनंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या सोहळ्याचा एक भाग म्हणून गावातील मान्यवर नागरिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत शाळकरी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ खेळूया पैठणीचा’ या मनोरंजक उपक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी व्यासपीठावर विकासशेठ सावंत (माजी उपसरपंच, देवीभोयरे), विश्वनाथ गाजरे गुरुजी, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार नाना ढवळे, बाबुराव मुळे, बबन मुळे, अक्षयशेठ बेलोटे, ताराचंद गाजरे, शरद बोरुडे, कमलाकर बेलोटे, बाबुराव बेलोटे, भाऊसाहेब बेलोटे, रामदास बेलोटे, नरेंद्र बेलोटे, जगन बेलोटे, विक्रम बेलोटे, विश्वनाथ बेलोटे, हर्षद झावरे, संदीप बेलोटे, संतोष केदारी, बाळासाहेब बेलोटे, रावसाहेब वाळुंज सर, दादाभाऊ बेलोटे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गजरे यांनी केले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि शिवभक्तीच्या घोषणांनी भारलेल्या वातावरणात शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!