अकोले - अहिल्यानगरअकोले -मारहाण करुन दरोडा टाकणारी टोळी जेरबंद अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर कार्यालय व अकोले पोलीस स्टेशन यांची मोठी कारवाई

अकोले -मारहाण करुन दरोडा टाकणारी टोळी जेरबंद अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर कार्यालय व अकोले पोलीस स्टेशन यांची मोठी कारवाई,सुरेगाव ता.श्रीगोंदा येथील आरोपी.. स्टार वन न्युज मराठी ™ 

Updated byस्टार वन न्युज मराठी ™ 

25 मार्च 2025

अहिल्यानगर – अकोले 

दिनांक १९/०३/२०२६ रोजी रात्री ०१/०० वा.चे सुमारास फिर्यादी सुरेखा माधव भोर वय ३५ वर्ष रा. धामणगव पाट ता. अकोले जि. अहिल्यानगर यांचे राहते घरी फिर्यादी, फिर्यादीचे पती, सासु असे घरात झोपलेले असताना कोणीतरी अनोळखी पाच इसमांनी त्यांचे घराचे दरवाजावर लाथ मारुन दरवाजा उघडवुन आत प्रवेश करुन फिर्यादी व साक्षीदार यांना धक्काबुक्की करुन धमकावून फिर्यादीचे गळयातील अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र त्यात सोन्याचे मणी व दोन सोन्याच्या वाट्या, दिड ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स तसेच फिर्यादीचे सासूचे गळयातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची पोत, अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे डोरले व १ विवो कंपनीचा मोबाईल असे एकुण १,१०,०००/- रु. किंमतीचा मुददेमाल काढून घेवुन निघुन गेले आहे. बगैर म।। चे फिर्यादी वरुन अकोले पोलीस स्टेशन गु.र.नं. १६५/२०२६ भा. न्या.सं. कलम ३१०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मा.श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांनी सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणणेकामी अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर येथील पथकातील तसेच अकोले पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमंलदार यांचे संयुक्त पथक तयार करुन आदेशीत केले होते.

  सदर आदेशाप्रमाणे पथकाने सखोल व बारकाईने व्यावसायिक कौशल्यपूर्ण व गोपनिय तपास करुन तसेच तांत्रिक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा बबुशा पिग्या काळे रा. सुरेगाव ता.श्रीगोंदा याने त्याचे साथीदारांसह केल्याची निष्पन्न झाल्याने सदर आरोपींचा शोध घेत असताना सदर आरोपी हा त्याचे साथीदारांसह सुरेगाव ता. श्रीगोंदा येथे लपुन बसला असल्याबाबत माहिती मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन तीन इसमांना जागीच पकडून त्यांना पथकाने ओळख सांगुन त्यांचे नाव गाव विचारले असता

१. बबुशा पिंग्या काळे वय २२ वर्ष २. शुभम पिंग्या काळे वय २० वर्ष ३. रवि लाला भोसले वय ५० वर्ष सर्व रा. सुरेगाव ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.

 

त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देवून सदर गुन्हा आम्ही आमचे इतर दोन साथीदारांसह केला असल्याचे सांगितले आहे. तसेच सदर आरोपींनी अशाच प्रकारचे गुन्हे नाशिक व पुणे जिल्हयात केल्याचे कबुल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे अकोले पोलीस स्टेशन हे करत आहे.

 

 सदरची कारवाई ही मा.श्री. सोमनाथ घार्गे साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, यांचे मार्गदर्शनाखाली

 

श्री. मोहन बोरसे, पोलीस निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर कार्यालयातील पो.स.ई. चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोडे, पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.हे.कॉ. सचिन धनाड, पो.हे.कॉ. संदीप दरंदले, पो.ना. रामेश्वर वेताळ, पो.कॉ. अशोक गाडे, पो.कॉ. राजेंद्र विरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण तसेच अकोले पोलीस स्टेशनचे पो.स.ई. विनोद खांडबहाले, पो. हे. कॉ. रविंद्र वाघचौरे, पो.कॉ. अविनाश गोडगे, पो.कॉ. सुहास गोरे, पो.कॉ. मनोहर मोरे यांनी केली आहे.

 

संपादक सचिन रेवगडे  +919623968773

 

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!