
Updated by स्टार वन न्युज मराठी ™
२ मार्च २०२६ संगमनेर – अहिल्यानगर
संपादक ✍️ सचिन रेवगडे
✍️✍️. संगमनेर तालगुका पोलीस ठाणे हद्दीत पो.नि प्रविण साळुंखे व पोलीस स्टाफ असे सरकारी वाहनाने ०५.३० वा सुमारास नाशिक पुणे हायवे ने पोलीस ठाणेकडे जात असताना कन्हे घाटाखाली सदर पोलीस पथकास एक पांढऱ्या रंगाची स्कार्पीओ मोटार कार काळया काचा असलेली संशईत दिसुन आली सदर मोटार कार चालकास सदर कार रस्त्याचे कडेला घेण्यास सांगितली सदर गाडी चालक यास पोलीस पथकाची ओळख देवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शाम कोंडीभाऊ काळे, वय ३० वर्षे, रा. रणखांब फाटा, खंडेरायवाडी, ता- संगमनेर असे असल्याचे सांगितले तसेच सदर स्कार्पीओचा क्रमांक पाहीला असता तो एमएच ४६ एक्स ४०४६ असा होता सदर स्कार्पीओ चे दरवाजे उघडुन पाहिले असता सदर मोटार कार मध्ये पांढऱ्या व खाकी रंगाच्या गोण्या दिसुन आल्या सदर गोण्याबाबत चालकास विचारणा केली असता त्याने सदर मध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला विमल गुटखा असल्याचे सांगितले सदर मो/कार चालकास ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन त्याचेविरूध्द पोहेकॉ ३२४/ अमित महाजन यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपीत शाम कोंडीभाऊ काळे, वय ३० वर्षे, रा. रणखांब फाटा, खंडेरायवाडी, ता- संगमनेर याचेकडे चौकशी करता त्यााने सदर गुटखा हा युसुफ चौगुले, रा. घारगांव, ता संगमनेर याचे सांगणेवरून धिरज माळी, शक्ती ट्रेडर्स, सिव्हासा याचेकडुन आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन सदरचा तपास पो.उप. निरी महेश शिंदे हे करत आहे.
सदर कामगिरी ही श्री. सोमनाथ घार्गे साो, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, मा. डॉ. कुणाल सोनवणे, मा. उप विभागिय पोलीस अधिकारी साो, संगमनेर विभाग, संगमनेर याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे संगमनेर तालुका पोलीस ठाणे यांनी तसेच सपोनि विकास काळे, पो.उप. निरी महेश शिंदे, पोहेकॉ अमित महाजन, पोहेकॉ सचिन उगले, पो.शि सोनवणे, पो. पो.शि शिरसाठ, पोहेकॉ चालक झोडगे यांनी केली आहे.





