अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

पारनेर तालुक्याला मानाचा तुरा गोवंडी (मुंबई) येथील मुख्याध्यापक अशोक शेंडकर यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार

पारनेर तालुक्याला मानाचा तुरा गोवंडी (मुंबई) येथील मुख्याध्यापक अशोक शेंडकर यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार

पारनेर तालुक्याला मानाचा तुरा गोवंडी (मुंबई) येथील मुख्याध्यापक अशोक शेंडकर यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार
निघोज – दिनांक 15 फेब्रुवारी पत्रकार (योगेश खाडे)
पारनेर तालुक्यातील लोणी मावळा गावचे सुपुत्र आणि सध्या गोवंडी, मुंबई येथे कार्यरत असलेले शिक्षक अशोक बबन शेंडकर यांना ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यांच्या वतीने हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
शेंडकर हे देवी एकवीरा विद्यालय, गोवंडी (मुंबई) येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी या विद्यालयात तब्बल २८ वर्षांची उल्लेखनीय सेवा बजावली आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते मुख्याध्यापक पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. शाळेचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ, शिस्तप्रिय प्रशासन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी या त्यांच्या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांची निवड केली.
शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी डी. एस. हायस्कूल, सायन (मुंबई) येथे आयोजित कार्यक्रमात ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात शेंडकर यांच्या नेतृत्वगुणांचा विशेष गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल नाना ढवळे, विकास शेंडकर व पारनेर तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच देवी एकवीरा विद्यालय परिवार, श्री छत्रपती विद्यालय, ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ लोणी मावळा यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.
गोवंडी (मुंबई) येथे कार्यरत असतानाही पारनेर तालुक्याचे नाव उंचावणाऱ्या शेंडकर यांच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!