अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

कवाद परिवाराकडून बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था ला ५ एअर बेडची भेट✍️ प्रतिनिधी. योगेश खाडे

कवाद परिवाराकडून बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था ला ५ एअर बेडची भेट

Updated by star one news marathi 

– प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपली
निघोज-दिनांक 27 फेब्रुवारी
निघोज येथील बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या समाजाभिमुख आरोग्य उपक्रमाला कवाद परिवाराकडून मोलाची साथ लाभली आहे. स्वर्गीय सुरेखा शांताराम कवाद यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डॉ. श्री. विजय शांताराम कवाद यांनी संस्थेला ५ आधुनिक एअर बेड भेट देत सामाजिक कर्तव्याची जाणीव जपली.
पतसंस्थेच्या वतीने निघोज व परिसरातील गरजू व आजारी रुग्णांसाठी २५ हॉस्पिटल बेड उपलब्ध करून देण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे. या सेवेला अधिक सक्षम करण्याच्या हेतूने डॉ. विजय कवाद यांनी ५ एअर बेड संस्थेचे चेअरमन श्री. वसंत कवाद यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी बोलताना डॉ. विजय कवाद म्हणाले की, “एअर बेडमुळे दीर्घकाळ एका जागी पडून राहणाऱ्या रुग्णांना हालचाल करण्यास मदत होते.

 

त्यामुळे जखमा होण्याचा धोका कमी होऊन रुग्णांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यास हातभार लागतो.”
संस्थेचे चेअरमन श्री. वसंत कवाद यांनी सांगितले की, पतसंस्थेच्या या बेड सुविधेचा निघोज व शिरूर परिसरातील १२७ रुग्णांनी लाभ घेतला आहे. खुबा, मणका, हात-पाय दुखापत, बायपास शस्त्रक्रिया, पॅरलिसिस आदी आजारांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. डॉ. विजय कवाद यांनी दिलेल्या ५ एअर बेडमुळे रुग्णांना अधिक चांगली व आधुनिक सुविधा देता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ज्या रुग्णांना एअर बेडची आवश्यकता असेल त्यांनी पतसंस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दत्तात्रय लंके, उपव्यवस्थापक श्री. शांताराम सुरकुंडे, प्रशासन अधिकारी श्री. सुनील तांबे, डॉ. स्मिता कवाद, सौ. सुनिता झावरे, सौ. सुप्रिया कवाद आदी मान्यवर उपस्थित होते.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!