संभाजीनगर

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर ‘खान्देश एक्सप्रेस वे’ लवकरच समृद्धी 🛣️महामार्गाशी कनेक्ट… हालचालींना वेग !

प्रतिनिधी ✍️ दुर्गेश रमेश गायकवाड

शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६

सध्या जळगावहून अजिंठा, सिल्लोड मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचण्यासाठी सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो.

समृद्धी महामार्गाशी जोडण्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास केवळ एका तासावर आणण्याचा निर्णय देखील त्या बैठकीत घेण्यात आला होता.

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग सहापदरी केव्हा करणार, असा प्रश्न विधान परिषदेत नुकताच उपस्थित झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती मागितल्यानंतर राज्य सरकारकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली.

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा १०५ किलोमीटर लांबीचा ‘खान्देश एक्सप्रेस वे’ थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडला जाईल.

सध्या या प्रस्तावित महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. डीपीआरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!