निघोज

स्व. सुनंदा लक्ष्मण झावरे यांचे दुःखद निधन

स्व. सुनंदा लक्ष्मण झावरे यांचे दुःखद निधन

स्व. सुनंदा लक्ष्मण झावरे यांचे दुःखद निधन
निघोज (वृत्तसेवा)
निघोज येथील रहिवासी स्वर्गीय सुनंदा लक्ष्मण झावरे (वय वर्षे ६७) यांचे मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने झावरे कुटुंबावर शोककळा पसरली असून निघोज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. सुनंदा झावरे या अत्यंत मनमिळावू, धार्मिक वृत्तीच्या व कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. सामाजिक व कौटुंबिक जीवनात त्यांनी नेहमीच प्रेम, संयम व आपुलकी जपली. त्यांच्या सहृदय स्वभावामुळे नातेवाईक, शेजारी व परिचितांमध्ये त्यांचा मोठा स्नेह होता.
त्यांच्या पश्चात
मुलगा – डॉ. महेंद्रकुमार लक्ष्मण झावरे,
मुलगा – डॉ. चेतन लक्ष्मण झावरे,
मुलगी – शुभांगी दत्तात्रय लामखडे,
सुना, जावई, नातवंडे व मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने झावरे कुटुंबाने एक प्रेमळ माता गमावली असून समाजाने एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
त्यांची दशक्रिया विधी गुरुवार, दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी निघोज येथील कुकडी नदीच्या तीरावर होणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!