राळेगण थेरपाळ–पिंपळनेर रस्त्याच्या कामासाठी सरपंच पंकज दादा कारखिले यांचे वसईकर साहेबांना निवेदन
राळेगण थेरपाळ–पिंपळनेर रस्त्याच्या कामासाठी सरपंच पंकज दादा कारखिले यांचे वसईकर साहेबांना निवेदन

राळेगण थेरपाळ–पिंपळनेर रस्त्याच्या कामासाठी सरपंच पंकज दादा कारखिले यांचे वसईकर साहेबांना निवेदन
निघोज दिनांक 8 जानेवारी – योगेश खाडे (पत्रकार)
राळेगण थेरपाळ ते पिंपळनेर या महत्त्वाच्या जोडरस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज दादा कारखिले यांनी सदर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण व दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी ठाम मागणी करत वसईकर साहेब यांना सविस्तर निवेदन दिले.
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात तर रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार, रुग्णवाहिका तसेच दैनंदिन प्रवासी यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा अपघात होण्याच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सरपंच पंकज दादा कारखिले यांनी निवेदनाद्वारे सांगितले की, हा रस्ता राळेगण थेरपाळ व पिंपळनेर परिसरातील ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून शेतीमालाची वाहतूक, शिक्षण व आरोग्य सेवा यासाठी हा रस्ता मुख्य आधार आहे. त्यामुळे रस्त्याचे मजबुतीकरण करून दर्जेदार डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांच्या समवेत गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे रस्त्याच्या कामाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. वसईकर साहेब यांनीही या मागणीची दखल घेत लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाल्यास राळेगण थेरपाळ व पिंपळनेर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून विकासाला चालना मिळेल, अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत



