निघोजला चार दिवस मानसिक त्रास दिलेले दोन मनोरुग्ण अखेर मनोयात्री पुनर्वसन केंद्रात.
निघोजला चार दिवस मानसिक त्रास दिलेले दोन मनोरुग्ण अखेर मनोयात्री पुनर्वसन केंद्रात.

निघोजला चार दिवस मानसिक त्रास दिलेले दोन मनोरुग्ण अखेर मनोयात्री पुनर्वसन केंद्रात.
निघोज दिनांक 15 जानेवारी
निघोज आणी परिसरात गेली चार दिवस दहशत निर्माण केलेले दोन मनोरुग्णांना मळगंगा – साईनाथ गणेश युवा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या सहकार्याने मध्यरात्री दोन वाजता ताब्यात घेऊन इसळक निंबळक या ठिकाणी असलेल्या रुग्ण सह मनोयात्री पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये पारनेरचे पोलिस निरीक्षक खेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हेडकॉन्स्टेबल कडूस व सहकाऱ्यांनी महत्वपूर्ण भुमिका घेतली होती. तसेच मळगंगा – साईनाथ गणेश युवा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे. निघोज व परिसरात असलेल्या सहकारी संस्था, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय तसेच गर्दीच्या ठिकाणी या दोन मनोरुग्णांनी लोकांना शिवीगाळ करणे, धावून जाणे, चावा घेण्याचा प्रयत्न करणे आदी विविध कृत्यं करीत त्रास देत होते गेली चार दिवसांपासून सकाळी साधारण दहा ते बारा व सायंकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत त्यांचे हे त्रास देण्याचे सत्र सुरू होते. याबाबत पत्रकार संघाने स्थानिक पोलीसांना गेली दोन दिवसांपूर्वी माहिती दिली होती. मात्र स्थानिक पोलीस बाहेरगावी असल्याने दखल घेण्यात आली नाही. बुधवार दि.१४ रोजी सायंकाळी सात वाजता मळगंगा मंदीर परिसरात या दोन मनोरुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी लोकांना चावा घेण्याचा तसेच दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मळगंगा – साईनाथ युवा गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य यांनी एकत्र येऊन त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांनी दहशत निर्माण करुण पळून गेले. याबाबत संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ,आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश ढवण तसेच पत्रकार संघ विभागीय कार्यालय पत्रकार सदस्यांनी तातडीने पोलिस निरीक्षक खेडकर यांच्याशी संपर्क करीत याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच निघोज येथील स्थानिक हेडकॉन्स्टेबल कडूस यांना याबाबत सुचना केली. त्यांनी लगेच याबाबत रात्रभर विवीध ठिकाणी बंदोबस्त ठेवला. मध्यरात्री दोन वाजता दोन्ही मनोरुग्णांना ताब्यात घेऊन मनोयात्री पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले.



