निघोज

निघोज येथे बिबट्या जेरबंद. बिबट्याच्या दुसऱ्या साथीदाराला पकडण्याची ग्रामस्थांची मागणी.

निघोज येथे बिबट्या जेरबंद. बिबट्याच्या दुसऱ्या साथीदाराला पकडण्याची ग्रामस्थांची मागणी.

निघोज येथे बिबट्या जेरबंद.
बिबट्याच्या दुसऱ्या साथीदाराला पकडण्याची ग्रामस्थांची मागणी.
निघोज / प्रतिनिधी
निघोज येथील वेताळबाबा स्टेडियम पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मुकामळा येथील लामखडे – वरखडे वस्तीवरील पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून अद्यापही आणखीन एक बिबट्या या परिसरात दिसत असून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात दोन पिंजऱ्यांची गरज असून वनविभागाने याची दखल घेण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. सोमवार दि.१९ ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. गेली एक महिन्यापूर्वी ग्रामपंचायतचे माजी सदस्य पोपटराव राणू लामखडे यांनी मुकामळा परिसरात बिबट्याचा उपद्रव सुरू झाला असून लामखडे यांच्या कालवडीला फस्त करण्याचे काम बिबट्याने केले असल्याची माहिती लामखडे यांनी पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज या ठिकाणी येऊन दिली. त्यानंतर पत्रकार संघाने वनविभाग अधिकाऱ्यांनी चर्चा करुण मुकामळा परिसरात तातडीने पिंजरा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. संबंधित वस्तीवरील युवकांनी परिसरातील दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेला पिंजरा या ठिकाणी आणून ठेवला मात्र त्यानंतरही या बिबट्याच्या जोडीने रात्री अपरात्री येऊन कोंबड्या,शेळ्या,कालवडी फस्त करण्याचे काम केले. महिनाभरात जवळपास या वस्तीवरील लोकांची दोन ते तीन लाखांचे जनावरे या दोन बिबट्यांनी फस्त केले आहेत. बिबट्याच्या भितीने या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीचे कामे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुर्ण करीत असत. सहा नंतर घरात अशी दहशत या बिबट्याच्या जोडीने निर्माण केली होती. मात्र हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने थोडी दहशत कमी झाली असली तरी दुसऱ्या बिबट्याला पकडण्याचे आव्हान मात्र कायम असल्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी काय भुमिका घेतात याकडे लक्ष वेधले गेले आहे. हा बिबट्या साधारण दोन वर्षाचा असून दुसरा बिबट्या मात्र यापेक्षा मोठा असून हा बिबट्या लवकरात लवकर जेरबंद करावा अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी वनविभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
चौकट.
मंगळवार दि.२० रोजी सकाळी अकरा वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे, वनपरिमंडळ अधिकारी साहेबराव भालेकर, वनरक्षक रेश्मा पाठक, वनसेवक विठ्ठल वाढवणे यांनी मुकामळा या ठिकाणी येऊन ब बिबट्याला ताब्यात घेतले असून. पारनेर येथील या बिबट्याची आरोग्य तपासणी करुन हा बिबट्या पारनेर पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव सावताळ जवळील नर्सरीमध्ये नेणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. बिबट्यांनी गेली सहा ते सात महिन्यात मोठ्या प्रमाणात माणसांवर हल्ले केल्याने हे बिबटे सोडून न देता या ८० एकर परिसरातील नर्सरीमध्ये पिंजऱ्यासहीत ठेवले जातात. तसेच त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तैनात असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!