
Updated by स्टार वन न्युज मराठी ™ star one news Marathi ⭐
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना शोकसभेत निघोज ग्रामस्थांची श्रद्धांजली.
30 जानेवारी 2026
निघोज / प्रतिनिधी ✍️ योगेश खाडे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे एक कार्यक्षम नेतृत्व होते. सर्वसामान्य जनतेसहीत शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी राज्याच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिले असून त्यांच्यासारखे नेतृत्व होणे नाही अशी भावना व्यक्त करीत निघोज ग्रामस्थांनी शुक्रवार दि.३० रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत पढवीमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहिली. शोकसभेच्या प्रारंभी ज्येष्ठ नेते नामदेवराव थोरात, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली वरखडे, माजी उपसरपंच उमेश सोनवणे, माजी सरपंच ठकाराम शेठ लंके डी बी लाळगे कंट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष दत्तात्रय लाळगे, बाजार समीतीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, दिलीपराव वराळ, मुंबई येथील व्यवसायीक मच्छिंद्रशेठ लंके, शांताराम लामखडे, निवृत्ती वरखडे, ग्रामपंचायत माजी सदस्या सुमनताई कवाद,,आपला गणपती सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष रविशेठ रणसिंग, मोहनशेठ खराडे , अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, आदींच्या हस्ते दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष खंडुजी भुकन,लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठान पदाधिकारी विश्वास शेटे, आपली माती आपली माणस, कचरदास महाराज वरखडे, ॲड.गणेश लाळगे, अर्जुन कवाद, भगवान भालेकर, भास्कर वरखडे, विठ्ठलराव कवाद, रमेश वरखडे, रोहिदास लामखडे,, कुशाभाऊ कवाद, चंद्रकांत वराळ, सहाय्यक कामगार तलाठी सुनिल उचाळे, मुस्लिम समाजाचे नेते बब्बुशेठ मोमीन, आदी उपस्थित होते. यावेळी अनेक पदाधिकारी व मान्यवर यांनी श्रद्धांजली अर्पण केली तसेच आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले शेवटी उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांनी ऋण व्यक्त केले.

चौकट
निघोज आणी परिसरासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. पक्ष मजबूत होण्यासाठी अजित दादा पवार यांचे योगदान मोठे असून सर्वसामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दादांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. दादा यांच्या सारखा नेता होणे नाही. दादांच्या कार्याची दखल इतिहास घेईल असे कार्य दादांनी केले आहे.
माउली वरखडे ( उपसरपंच निघोज ग्रामपंचायत )




