
✍️Updated by ✨स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा™
12 जानेवारी 2026
अकोले 🔴अहिल्यानगर (जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरण)
गणोरे – अकोले तालुक्यातील गणोरे येथील श्रीपाद रुरल हॉस्पिटल चे मालक रेवण वाकचौरे याचे नवीन हॉस्पिटल चे बांधकाम सुरू असून सुरू असलेल्या हॉस्पिटल च्या दुसऱ्या मजल्यावर
बांधकाम सुरू असून बांधकाम कारागिराने काही व्यक्तींच्या जाचाला तसेच कर्जाला कंटाळून (23 ऑक्टोबर ) रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती .

आत्महत्या करणाऱ्या इसमाचे जगन्नाथ संपत कानवडे असे असून सदर इसम हा संगमनेर तालुक्यातील सावरचोळ , मेंगळवाडी येथील आहे तर हल्ली तो अकोले येथील महालक्ष्मी रोड येथे राहत होता.
मृत्यूपूर्वी पोलीस निरीक्षकांना कानवडे याचे खिशात सुसाईड नोट मिळून आली. त्यात सात आरोपीविरुद्ध आरोप करण्यात आले. यामुळे यातील आरोपींनी संगमनेर येथील न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले
यातील सात आरोपी पैकी पाच आरोपींना संगमनेर येथील न्यायालयायाने अटकपूर्व जामीन मंजूर केला
तसेच आरोपी संदीप वाकचौरे आणि शेखर वाकचौरे यांचा अटकपूर्व जामीन ना मंजूर करण्यात आला आहे.
त्यानंतर आरोपी शेखर आणि संदीप वाकचौरे फरार होते पोलिसा कडून शोधाशोध घेऊन आरोपी चा ठाव ठिकाणा लागला नाही..
त्यानंतर आरोपी नी अटकपूर्व जामीन साठी हायकोर्ट मध्ये अपील केले
✍️आरोपी च्या वतीने हायकोर्ट मध्ये तात्पुरता जामीन मिळावा यासाठी अपील (17 नोव्हेंबर) दाखल करण्यात आले
हायकोर्ट कडून आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे पुढील अटकपूर्व जामीनाची सुनावणी होईपर्यंत 8 डिसेंबर 2025 पर्यंत तात्पुरता जामीन दिला परंतु हायकोर्टचे काही कारणास्तव कामकाज बंद असल्याने 14 जानेवारी 2026 तारीख देण्यात आली.
आरोपीच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार असून त्यानंतर आरोपीच्या अटकेबाबत आदेश काय असू शकेल हे समजेल
🚨अकोले चे पी आय बोरसे साहेब यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी
सांगितले की आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे आणि अन्य यांच्या विरुद्ध भक्कम पुरावे आमच्याकडे आहे संदीप आणि शेखर वाकचौरे यांच्या अनेक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंगं असून त्यांचा ही पंचनामा आम्ही केला असून तो चार्जशीट मध्ये दाखल केला असून आरोपी पुढे ही निर्दोष सुटू शकणार नाही
✍️कायद्याची प्रक्रिया आहे थोडा वेळ लागू शकतो परंतु आम्ही पुरावे गोळा करण्यात कुठलाही कसूर केला नसून आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे यांचा तात्पुरता जामीन 14 तारखेला रद्द होईल असा आमचा विश्वास आहे. आणि आम्हाला आरोपी हे अटक पाहिजे त्याशिवाय अन्य तपास करता येणार नाही आणि चार्जशीट ही कोर्टात टाकता येणार नाही याबाबत आम्ही माननीय कोर्टा ला विनंती करू आणि आरोपीचा जामीन कॅन्सल होईल यात काही शंका नाही असे सांगण्यात आले.
✍️™तसेच डॉक्टर रेवण विरोधात पुरवणी जबाब दाखल होऊनही त्यावर काही कार्यवाही केली नसल्याबाबत
मयत जगन्नाथ कानवडे यांचे नातेवाईक हे संतप्त झाले असून याबाबत अकोले पोलिस निरीक्षक यांना कार्यवाही बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही डॉ रेवण वर कार्यवाही करणार आहोत परंतु त्याआधी आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊदया डॉ रेवण विरोधात पुरवणी जबाबचे आम्ही माननीय कोर्टा समोर सांगू त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करू
तसे ही रेवण विरोधात पुरवणी जबाब असल्याकारणाने रेवण ही यात आरोपी आहे तेव्हा जेव्हा केस सुरू होईल तेव्हा ही माननीय कोर्ट रेवण विरोधात कार्यवाही करण्याची आणि त्याला आरोपी करण्याचा आदेश देऊ शकते.
आरोपी चे जामीन रद्द करून त्यांना अटक व्हावी आणि डॉ रेवण वर कार्यवाही करणे बाबत कानवडे कुटुंबानि आमदार लहामटे कडे धाव घेतली असून सर्व हकीकत आणि कॉल रेकॉर्डिंग ऐकून घेतल्यानंतर आमदार लहामटे म्हणाले की यात मुख्य आरोपी डॉ रेवण ला करावा लागत होत परंतु तसे काही झाले नसल्याने
✍️✍️आमदार लहामटे यांनी अकोले पी आय यांना याबाबत कॉल करून डॉ रेवण वर कार्यवाही का नाही झाली अजून याबाबत विचारणा केली असता अकोले पीआय यांच्याकडून असे सांगण्यात आले की पुरवणी जबाब नंतर दाखल करण्यात आला फिर्यादी मधे त्याचे नाव नसल्याने आम्हाला त्यावर कार्यवाही करता आली नाही
✍️आम्ही वरिष्ठांना याबाबत माहिती दिली असून आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे च्या जामीन अर्ज वर सुनवावी नंतर आम्ही रेवण वर कार्यवाही करू फक्त आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडूद्या
त्यावर आमदार साहेबांनी अशा सूचना ही दिल्या की यात डॉ रेवण वर कार्यवाही झाली पाहिजे कानवडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे नाहीतर मला गृहमंत्री फडणवीस साहेबांसमोर जाऊन बसावे लागेल यावर पिआय बोरसे साहेबांनी अशी वेळ येणार नाही मी लवकरात लवकर डॉ रेवण विरोधात कार्यवाही करणार असल्याबाबत आश्वासन दिले

डॉ रेवण विरोधात कार्यवाही न होण्यामागचे कारण ही डॉक्टर रेवण चे वडील गणपत (सीताराम) वाकचौरे आणि रेवण चा भाऊ बाळासाहेब वाकचौरे हे लोकांना सांगतात की आम्ही अकोले पोलिस ना दहा लाख रुपये दिले आहे त्यामुळे आमच्यावर पोलिस कार्यवाही करू शकत नाही. जर पोलिस नि पैसे घेतले नसतील तर रेवण वर कार्यवाही करावी
आणि अकोले पोलिस ची बदनामी करणाऱ्या वर ही कार्यवाही..
🚨आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे चा जामीन नामंजूर होऊन त्यांना अटक झाली पाहिजे याबाब आम्ही लहामटे साहेब यांची भेट घेतली असून त्यांनी अकोले पोलिसांकडें अहवाल मागितला आहे मदत करण्याचे आणि न्याय मिळून देण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे
तसेच डॉ रेवण यात आरोपी आहे आम्ही पुरवणी जबाब दिला असून त्यावर कार्यवाही करावी अन्यथा आम्ही लवकरच गृहमंत्री तथा मुख्यमंत्री फडणवीस साहेब याना भेटणार आहो
⭐
⭐ रोहिणी विटे✍️ मयत जगन्नाथ कानवडे यांची बहीण
✍️डॉ रेवणवर कार्यवाही झाल्यानंतर हॉस्पिटल मधील अन्य प्रकार ही लवकर समोर येणार आहे त्यामुळे कार्यवाही करण्यावर अकोले करांचे लक्ष लागले आहे





