मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची विशेष सर्वसाधारण वार्षिक सभा कुंड पर्यटन स्थळावरील हॉलमध्ये उत्साहात संपन्न
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची विशेष सर्वसाधारण वार्षिक सभा कुंड पर्यटन स्थळावरील हॉलमध्ये उत्साहात संपन्न

निघोज, दिनांक २१ डिसेंबर (योगेश खाडे)
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची विशेष सर्वसाधारण वार्षिक सभा कुंड पर्यटन स्थळावरील हॉलमध्ये उत्साहात संपन्न
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची विशेष सर्वसाधारण वार्षिक सभा कुंड पर्यटन स्थळ येथील हॉलमध्ये अत्यंत उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वसंतराव कवाद यांनी भूषविले. ग्रामीण विकास, देवस्थान विकास तसेच कुंड पर्यटन स्थळाच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व विकासाभिमुख चर्चा या सभेत झाली.
सभेत देवस्थान विकासासाठी सुरू असलेली कामे सुंदर पद्धतीने व नियोजनबद्ध रीतीने सुरू असल्याचे नमूद करण्यात आले. काही कामे अद्याप पूर्ण होणे बाकी असल्याने ती लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढील काळात सातत्याने पाठपुरावा करण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. देवस्थान परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था तसेच भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
याचबरोबर कुंड पर्यटन स्थळाच्या विकासासंदर्भातही सखोल चर्चा झाली. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, पर्यावरणपूरक विकास तसेच पर्यटनवृद्धीसाठी राबवायच्या उपक्रमांबाबत उपस्थितांनी विविध सूचना मांडल्या.
या विशेष सर्वसाधारण वार्षिक सभेला ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष वसंतराव कवाद, उपाध्यक्ष अमृता शेठ रसाळ, सचिव शांताराम काळसकर साहेब, सहसचिव विश्वासराव शेटे, ज्येष्ठ विश्वस्त बबन मामा लंके, रामदास ससाने, रमेश अण्णा ढवळे, संतोष रसाळ, अॅड. ज्ञानेश्वर लामखडे, बाळासाहेब लंके, अनिल लंके, रोहिदास लामखडे, मोहिनी वरखडे, सीमा वराळ, मंगेश वराळ यांच्यासह ट्रस्टचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना अध्यक्ष वसंतराव कवाद यांनी सविस्तर व समाधानकारक उत्तरे दिली. ट्रस्टच्या कार्यपद्धतीबाबत, विकासकामांच्या प्रगतीबाबत तसेच भविष्यातील नियोजनाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
अध्यक्ष वसंतराव कवाद यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सभासदांच्या सक्रिय सहभागामुळे ही विशेष सर्वसाधारण वार्षिक सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.



