अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोज

कै. स्व. शांताराम मामा लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या सुंदर वाणीतून संप्पन.

कै. स्व. शांताराम मामा लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या सुंदर वाणीतून संप्पन.

निघोज -23 डिसेंबर (योगेश खाडे)
कै. स्व. शांताराम मामा लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या सुंदर वाणीतून संप्पन.मच्छिंद्रशेठ लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होत असून, सहाव्या दिवशीची कीर्तन सेवा विशेष लक्षवेधी ठरली.
सहाव्या दिवशीची किर्तन रुपी सेवा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी वाणीतून “इतिहास आणि धुरंदर” या विषयावर सखोल निरूपण केले. इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचे कार्य, त्याग व शौर्य यांचा दाखला देत महाराजांनी समाजाला दिशा देणाऱ्या धुरंदर व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिली. नीतिमूल्ये, संयम, दूरदृष्टी आणि लोककल्याणाची भावना हेच खरे धुरंदरपण असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
कीर्तनादरम्यान सादर झालेल्या अभंग, ओव्या व दृष्टांतांनी संपूर्ण सभामंडप भक्तिरसात न्हाऊन निघाला. टाळ-मृदंगाच्या गजरात भाविक मंत्रमुग्ध झाले होते. महाराजांच्या वाणीतून व्यक्त झालेला विचारांचा ठेवा उपस्थितांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेला.
स्व. शांताराम मामा लंके यांच्या स्मृतींना अभिवादन करणारा हा पुण्यस्मरण सप्ताह श्रद्धा, सेवा आणि संस्कारांचा जागर ठरत असून, सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरली. सप्ताहामुळे परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!