AKOLE -डॉ रेवण विरोधात जबाब दाखल दहा दिवस उलटूनही .अजून कार्यवाही का नाही ? मयत कानवडे च्या नातेवाईका चा संतप्त सवाल.कार्यवाही करावी अन्यथा एस पी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार नातेवाईकांचा इशाराअकोले अहिल्यानगर (जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरण)

डॉ रेवण वाकचौरे विरोधात मयत जगन्नाथ कानवडे चे नातेवाईक आक्रमक–पोलिसांवर गंभीर आरोप. DYSP ,SP सह मुख्यमंत्री पालकमंत्र्यांना तक्रारी अर्ज.आरोपी तसेच डॉ रेवण सोबत पोलिसाचे संगनमंत. डॉ रेवण ला आरोपी करा तक्रारी अर्जात नमूद.

Page visiter –8 लाख 55 k
Page visiter –8 लाख 55 k

Updated byस्टार वन न्युज मराठी ™ 

1 डिसेंबर 2025 ✍️अहिल्यानगर 

अकोले 🔴अहिल्यानगर (जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरण)

स्टार प्रतिनिधी –अकोले ✍️ डॉ रेवण वाकचौरे विरोधात मयत जगन्नाथ कानवडे चे नातेवाईक आक्रमक–पोलिसांवर गंभीर आरोप. DYSP ,SP सह मुख्यमंत्री पालकमंत्र्यांना फिर्यादी संकेत चा तक्रारी अर्ज.आरोपी तसेच डॉ रेवण सोबत पोलिसाचे संगनमंत. रेवण ला आरोपी करा तक्रारी अर्जात नमूद.

गणोरे – अकोले तालुक्यातील गणोरे येथील श्रीपाद रुरल हॉस्पिटल चे मालक रेवण वाकचौरे याचे नवीन हॉस्पिटल चे बांधकाम सुरू असून सुरू असलेल्या हॉस्पिटल च्या दुसऱ्या मजल्यावर 

 बांधकाम सुरू असून बांधकाम कारागिराने काही व्यक्तींच्या जाचाला तसेच कर्जाला कंटाळून (23 ऑक्टोबर ) रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती .

घटना घडल्या नंतर पाच दिवसानंतर फिर्याद दाखल केली होती 

त्यानंतर पोलिसांचे पथक आरोपी ना पकडण्यासाठी रवाना झाले परंतु आरोपी फरार झाले. आरोपी नी संगमनेर येथील कोर्टात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली.

 त्यातील रावसाहेब वाकचौरे, दिनेश वाकचौरे, अशोक वाकचौरे. श्रीकांत आंबरे, रमेश वाकचौरे ना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता 

 

तक्रारी अर्ज 👇

 

परंतु दोन आरोपी शेखर वाकचौरे आणि संदीप वाकचौरे चा जामीन संगमनेर कोर्टाने फेटाळला.

त्यानंतर नातेवाईकांनी  डॉक्टर रेवण वाकचौरे ला आरोपी करा असा आग्रह धरला परंतु पोलिसांनी रेवण विरोधात कुठलेही पाऊल न उचलल्याने संतप्त तीस ते चाळीस नातेवाईकांनी थेट गणोरे येथील डॉक्टर रेवण चे हॉस्पिटल गाठले परंतु हॉस्पिटल बंद होते त्यामुळे नातेवाईकांचा रोष वाढला आणि श्रीपाद रुरल हॉस्पिटल  समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

घटनास्थळी अकोले पोलिस स्टेशन चे psi खांडबहाले साहेब आणि त्यांची टीम हजर झाली. डॉ रेवण समोर हजर होत नाही आणि रेवण ला यात आरोपी करत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा नातेवाईक यांनी घेतला.

✍️पोलिसांनी नातेवाईक यांची कशीतरी समजूत काढून अकोले पोलिस स्टेशन येथे चला डॉ रेवण विरोधात आम्हाला काहीतरी जबाब द्या आम्ही पुढील कार्यवाही करू असे आश्वासन देण्यात आले.👇

 

रेवण विरोधात त्यादिवशी पुरवणी जबाब दाखल झाला परंतु डॉ रेवण वर कुठलही कार्यवाही झाली नाही.

त्यामुळे मयत जगन्नाथ कानवडे यांचे नातेवाईक हे आक्रमक झाले असून थेट अकोले पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत .

   

अकोले पोलिस डॉ रेवण वाकचौरे आणि अन्य आरोपी ना वाचवत असल्याबाबत तक्रारी अर्जात नमूद केले असून संगमनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) कुणाल सोनावणे यांच्याकडे आज (1 डिसेंबर) रोजी तक्रारी अर्ज दाखल केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना तसेच अकोल्याचे आमदार किरणजी लहामठे यांना ही तक्रारी अर्ज देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

    तसेच श्रीकांत आंबरे आणि डॉ रेवण हे घटना घडली तेव्हा तिथेच हजर होते जेव्हा मयत जगन्नाथ कानवडे यांनी फाशी घेतली त्यावेळी ही दोघे तिथेच होते घटना घडल्यानंतर त्यांनीच नातेवाईक यांना कळवले आणि तेथून फरार झाले आम्ही सगळे तिथे पोहचलो तेव्हा परत दोघे तिथे हजर झाले. असे ही तक्रारी अर्जात नमूद केले आहे 

 

मयत जगन्नाथ कानवडे यांच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली असून अटकपूर्व जामीन झालेल्यांविरोधात जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्ट औरंगाबाद येथे अपील करणार असल्याबाबत माहिती मिळाली असून. आरोपी श्रीकांत आंबरे शेखर वाकचौरे, संदीप वाकचौरे अन्य आरोपी विरोधात धक्कादायक कॉल रेकॉर्डिंगं हाथी लागल्याने यातील आरोपी विरोधात भक्कम पुरावे कोर्टात सादर होऊन जामीन रद्द होण्यास मदत मिळणार असल्याबाबत नातेवाईकांनी सांगितले.

 

त्यातच डॉ रेवण आणि मयत जगन्नाथ कानवडे यांच्या ही कॉल रेकॉर्डिंग मिळून आल्याने हे स्पष्ट होत की श्रीकांत आंब्रे आणि मयत जगन्नाथ कानवडे यांचे मधे भांडण सुरू होते याची आधीच कल्पना डॉ रेवण वाकचौरे ला होती 

अन्य काही कॉल रेकॉर्डिंग हाती लागल्याने अन्य लोकांना ना सह आरोपी करणे शक्य होणार आहे.

 

✍️आम्ही तक्रारी अर्ज दिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि Sp साहेब यांनी डॉ रेवण विरोधात कार्यवाही करावी मिळालेले कॉल रेकॉर्डिंग तपासावे अन्य आरोपी ना सह आरोपी करावे. राहिलेले दोन आरोपी संदीप शेखर वाकचौरे यांचा जामीन रद्द करून त्यांना अटक करावी अन्यथा आम्ही sp कार्यालय अहिल्यानगर समोर आमरण उपोषण करणार आहोत अशी माहिती फिर्यादी संकेत कानवडे याने दिली आहे … 

 

 

 

Page visiter –8 लाख 55 k

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!