अकोलेअकोले अहिल्यानगर (जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरण)

अकोले –CM देवेंद्र फडणवीस (गृह सचिवालय मंत्रालय) यांच्या कडून संकेत कानवडे यांच्या तक्रारी अर्जाची दखल. चौकशी करण्याचे संबधित विभागाला आदेश. रेकॉर्डिग मधील तथ्य,डॉ रेवण होणार सह आरोपी?

संबंधित( 8 डिसेंबर)सुनावणी मध्ये आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे च्या विरोधात भक्कम असे पुरावे असून आरोपींचा तात्पुरता जामीन हा कॅन्सल होणार असून कोर्ट आदेशाने आम्ही त्यांना लवकरच ताब्यात घेऊन अटक करणार आहोत      👇अकोले पोलिस निरीक्षक मो. बोरसे

Page Visiter 10 Lakh 7 k
Page Visiter 10 Lakh 7 k

Updated by ·स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा ✍️ 

5 डिसेंबर 2025

स्टार प्रतिनिधी ™ ✍️

✍️गणोरे – 

.  अकोले तालुक्यातील गणोरे येथील श्रीपाद रुरल हॉस्पिटल चे मालक रेवण वाकचौरे याचे नवीन हॉस्पिटल चे बांधकाम सुरू असून सुरू असलेल्या हॉस्पिटल च्या दुसऱ्या मजल्यावर  ✍️ बांधकाम सुरू असून बांधकाम कारागिराने काही व्यक्तींच्या जाचाला तसेच कर्जाला कंटाळून (23 ऑक्टोबर ) रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती . घटना घडल्या नंतर पाच दिवसानंतर फिर्याद दाखल केली होती  त्यानंतर पोलिसांचे पथक आरोपी ना पकडण्यासाठी रवाना झाले परंतु आरोपी फरार झाले. आरोपी नी संगमनेर येथील कोर्टात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली.  त्यातील रावसाहेब वाकचौरे, दिनेश वाकचौरे, अशोक वाकचौरे. श्रीकांत आंबरे, रमेश वाकचौरे ना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता  परंतु दोन आरोपी शेखर वाकचौरे आणि संदीप वाकचौरे चा जामीन संगमनेर कोर्टाने फेटाळला. 

 

  •    त्यानंतर नातेवाईक नि डॉक्टर रेवण वाकचौरे ला आरोपी करा असा आग्रह धरला परंतु पोलिसांनी रेवण विरोधात कुठलेही पाऊल न उचलल्याने संतप्त तीस ते चाळीस नातेवाईकांनी थेट गणोरे येथील डॉक्टर रेवण चे हॉस्पिटल गाठले परंतु हॉस्पिटल बंद होते त्यामुळे नातेवाईकांचा रोष वाढला आणि हॉस्पिटल समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. घटनास्थळी अकोले psi खांडबहाले साहेब आणि त्यांनी त्यांची टीम हजर झाली. डॉ रेवण समोर हजर होत नाही आणि रेवण ला यात आरोपी करत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा नातेवाईक यांनी घेतला.

पोलिसांनी नातेवाईक यांची कशीतरी समजूत काढून अकोले पोलिस स्टेशन येथे चला डॉ रेवण विरोधात आम्हाला काहीतरी जबाब द्या आम्ही पुढील कार्यवाही करू असे आश्वासन देण्यात आले.

रेवण विरोधात त्यादिवशी पुरवणी जबाब दाखल झाला परंतु डॉ रेवण वर कुठलही कार्यवाही झाली नाही.

मयत जगन्नाथ कानवडे यांनी फाशी घेतली होती त्यादिवशी तिथे डॉक्टर रेवण आणि श्रीकांत आंबरे हा उपस्थित होता. 

अर्जात अनेक धक्कादायक खुलासे केले असून यावर लवकरच दबावाला न बळी पडता कार्यवाही होणार हे निश्चित.

    🌐मयत जगन्नाथ कानवडे यांच्या फोन लोकेशन वरून हे स्पष्ट होत की (23 ऑक्टोबर )दुपार पासून जगन्नाथ कानवडे हे गणोरे मध्ये होते लोकेशन ही डॉक्टर रेवण चे हॉस्पिटल जवळचेच आहे. मग त्यावेळेस तिथे काय काय घडले हे श्रीकांत आंब्रे आणि डॉ रेवण वाकचौरे ला माहित आहे त्यातच डॉ रेवण आणि जगन्नाथ कानवडे यांच्या फोन कॉल वरून हे स्पष्ट आहे की चिट्ठी मधे नावे लिहून ठेवली ती सर्व जगन्नाथ कानवडे यांना त्रास देत आहे हे डॉ रेवण ला माहित होते.

 

  • डॉक्टर रेवण वाकचौरे वर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही सगळ्या आरोपी चे जामीन झाले तरी अकोले पोलिस काही ऍक्शन घेताना दिसत  नसल्याने 
  • ✍️
  •  मयत जगन्नाथ कानवडे यांचे नातेवाईक हे आक्रमक झाले असून थेट अकोले पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत .

 

  ✍️त्यानंतर मयत जगन्नाथ कानवडे यांच्या नातेवाईक आणि फिर्यादी संकेत कानवडे यांनी थेट तक्रारी अर्ज केला असून अर्जा मध्ये अकोले पोलिसांच्या कार्य प्रणालीवरच बोट ठेवले असून डॉ रेवण वर गंभीर आरोप केले आहे.

. तसा तक्रारी अर्ज राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला असून त्यांनी ही अर्जातील तक्रारी अर्जाचे तसेच पुराव्यांचे अवलोकन करून तात्काळ संबधित विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे   देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेच परंतु ते एक वकील सुद्धा आहे. त्यांनी त्वरित संबधित विभागला सूचना केल्या असून यात अजून कोण कोण आरोपी करता येईल याची चौकशी होणार असून पीडित कानवडे कुटुंबाला न्याय मिळण्याची अशा पल्लवित झाली असून आत्महत्या करण्या अगोदर मयत जगन्नाथ कानवडे यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे खंत व्यक्त केली होती की जाऊद्या नाही देऊद्या माझ्या कामाचे पैसे मी त्या बांधकामावर त्यांची नावे चिट्टी लिहून ठेवून फाशी घेईल पण त्यांना एकालाही सोडू नका त्यांचे तुकडे तुकडे करा डुकरांना खाऊ घाला पण त्यांना शिक्षा झाली पाहिजे माझे पत्र वरपर्यंत न्या मला न्याय मिळाला पाहिजे..

 

   हे ही वाचा 👇 

यावर क्लिक करा 👇 

डॉ रेवण वाकचौरे विरोधात मयत जगन्नाथ कानवडे चे नातेवाईक आक्रमक–पोलिसांवर गंभीर आरोप. DYSP ,SP सह मुख्यमंत्री पालकमंत्र्यांना तक्रारी अर्ज.✍️आरोपी तसेच डॉ रेवण सोबत पोलिसाचे संगनमंत. डॉ रेवण ला आरोपी करा तक्रारी अर्जात नमूद.*

✍️आज खऱ्या अर्थाने तक्रारी अर्ज हा मंत्रालयात गेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या अर्जाची दखल घेतली आणि संबंधित विभागाला आदेश दिले गेले. यावरून कुठेतरी मयत जगन्नाथ कानवडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल याची आशा आता वाटू लागली आहे.. 

 

  •   तसे पत्र ही देवेंद्र फडणवीस सचिवालय मंत्रालया कडून मयत जगन्नाथ कानवडे यांची बहीण रोहिणी विटे तसेच मुलगा संकेत कानवडे यांना देण्यात आले आहे 

 

  🌐अकोले तालुक्याचे आमदार किरणजी लहामठे साहेब DYSP,SP AD,SP SHRIRAMPUR अजून संबंधित विभागाला ही तक्रारी अर्ज दिला गेला असून सापडलेला रेकॉर्डिंग आणि CCTV च्या आधारे त्यांच्याकडून लवकरच चौकशी होऊन अन्य व्यक्ती तसेच डॉ रेवण सहआरोपी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

    तसेच येत्या 8 डिसेंबर ला आरोपी संदीप वाकचौरे आणि शेखर वाकचौरे यांच्या तात्पुरत्या जमिनीवर सुनावणी साठी अकोले पोलिस तपास अधिकारी यांना आरोपी विरोधात असणारे पुरावे तसेच म्हणणे मांडण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिला असून 8 तारखेला तपास अधिकारी आरोपी विरोधातील पुरावे संबंधित कॉल रेकॉर्डिंग घेऊन हजर होणार आहे 

अशी माहिती अकोले पोलिसांकडून मिळाली आहे 

 

संबंधित( 8 डिसेंबर)सुनावणी मध्ये आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे च्या विरोधात भक्कम असे पुरावे असून आरोपींचा तात्पुरता जामीन हा कॅन्सल होणार असून कोर्ट आदेशाने आम्ही त्यांना लवकरच ताब्यात घेऊन अटक करणार आहोत 

    👇अकोले पोलिस निरीक्षक मो. बोरसे

 

Page Visiter 10 Lakh 7 k
Page Visiter 10 Lakh 7 k

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!