गटनेते जालिंदर वाकचौरे याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडसणीस तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे Jayakumar Gore यांना निवेदन मुंबई ✍️

मुंबई ✍️ नगर जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक काळातील कामांची उच्चस्तरीय चौकशी करावी,गटनेते जालिंदर वाकचौरे याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडसणीस तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन 

Updated by स्टार वन न्युज मराठी ™ 

14 डिसेंबर 2025 अकोले ·अहिल्यानगर 


    मुंबई ✍️ नगर जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक काळातील कामांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडसणीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.

  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने दिलेल्या निवेदनात वाकचौरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये २०२२ पासून प्रशासक आहेत

. याकार्यकाळात जिल्हा परिषदेने जवळपास विविध योजनेतून २५०० कोटींचा खर्च केला आहे. यामध्ये प्रचंड भ्रष्ट्राचार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच बरीचशी कामे कागदावरच केलेली आहे व जी कामे झाली त्याची टेंडर चुकीच्या पद्धतीने केली आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, ज्या वस्तू जिल्हा परिषदेने खरेदी केल्या त्या सुद्धा निकृष्ट असून, अवाच्या सवा किमती लावल्या आहेत, असे सांगून, प्रशासक काळातील कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी वाकचौरे यांनी केली.

 

 

 

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!