AKOLE -डॉ रेवण विरोधात जबाब दाखल दहा दिवस उलटूनही .अजून कार्यवाही का नाही ? मयत कानवडे च्या नातेवाईका चा संतप्त सवाल.कार्यवाही करावी अन्यथा एस पी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार नातेवाईकांचा इशाराअकोलेअकोले अहिल्यानगर (जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरण)

AKOLE -डॉ रेवण विरोधात जबाब दाखल दहा दिवस उलटूनही .अजून कार्यवाही का नाही ? मयत कानवडे च्या नातेवाईका चा संतप्त सवाल.कार्यवाही करावी अन्यथा एस पी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार नातेवाईकांचा इशारा.. कॉल रेकॉर्डिंग मधील धक्कादायक संभाषण 👇

. मयत जगन्नाथ कानवडे याने ज्यादिवशी आत्महत्या केली त्याचे पाच ते सहा दिवस अगोदर तसेच काही तास अगोदरचे कॉल रेकॉर्डिंग मध्ये स्वतः मयत जगन्नाथ कानवडे हा दुसऱ्या व्यक्ती ला सांगतोय कि माझी जगायची इच्छा नाही मला शेखर ,संदीप ,आणि रमेश वाकचौरे नि खुफ त्रास दिला आहे मी सगळ्यांची नावे लिहून ठेवनार आणि चालू असणाऱ्या कामावर मी फासी घेणार मी मेल्यावर एकालाही सोडू नका .यांचे तुकडे तुकडे करा आणि डुकरांना खाऊ घाला पण एकालाही सोडू नका .

UPDETED By- star one news marathi 

२५ नोव्हेंबर २०२५ -गणोरे –अकोले –

अकोले 🔴अहिल्यानगर (जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरण)

 

स्टार प्रतिनिधी-

गणोरे – अकोले तालुक्यातील गणोरे येथील श्रीपाद रुरल हॉस्पिटल चे मालक रेवण वाकचौरे याचे नवीन हॉस्पिटल चे बांधकाम सुरू होते सुरू असलेल्या हॉस्पिटल च्या दुसऱ्या मजल्यावर 

 बांधकाम सुरू असून बांधकाम कारागिराने काही व्यक्तींच्या जाचाला तसेच कर्जाला कंटाळून (23 ऑक्टोबर ) रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती .

       आत्महत्या करणाऱ्या इसमाचे जगन्नाथ संपत कानवडे असे असून सदर इसम हा संगमनेर तालुक्यातील सावरचोळ , मेंगळवाडी येथील आहे तर हल्ली तो अकोले येथील महालक्ष्मी रोड येथे राहत होता.

     जगन्नाथ कानवडे यांनी आत्महत्या केली जसजसे पुरावे हातात येत आहे त्यावरून प्रकरणाला वेगळे वळण लागत आहे .

       मयत जगन्नाथ कानवडे यांचा मुलगा संकेत कानवडे याने अकोले पोलीस स्टेशन येथे २८ आक्टोम्बर रोजी सात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली होती . त्यात गणोरे येथील श्रीपाद रूरल हॉस्पिटल चे मालक डॉक्टर रेवण वाकचौरे चे नाव नव्हते .परंतु नातेवाईकांच्या डॉ रेवण च्या काही संशयित गोष्टी लक्ष्यात आल्याने नातेवाईकांनी थेट अकोले पोलीस स्टेशन गाठले आणि डॉ रेवण ला यात सहआरोपी करा या साठी अकोले पोलिसाना धारेवर धरले .

       परंतु डॉ रेवण विरोधात आमच्याकडे कुठलाही जबाब नाही घटने बाबत त्यांना विचारले असता मी घटनास्थळी येण्या अगोदरच नातेवाईक यांनी मृत्यूदेह खाली घेतला होता अशी माहिती दिली . परंतु काही cctv फुटेज प्राप्त झाल्यानंतर डॉ रेवण हा मृतदेह काढते वेळी घटनास्थळी होता .तो मृतदेह नेण्यासाठी तेथे एक ओमिनी चार चाकी गाडी सुद्दा आणण्यात आली होती. ती गाडी कोणाची याचा तपास आम्ही केला असता ती गाडी या आधी ऍम्ब्युलन्स म्हणून डॉ रेवण उपयोग करत होता . त्याचा हि तपास लवकरच करण्यात येईल अशी माहिती पीआय बोरसे साहेबानी नातेवाईकांना दिली.

    तपास करून ती गाडी ताब्यात घेऊन डॉ रेवण ला अटक करा आरोपींचे जामीन होऊन देऊ नका यावरच नातेवाईक ठाम होते .तेव्हा डॉक्टर रेवण ला अकोले पोलिसानी नोटीस देऊन जबाब दाखल कामी पोलीस स्टेशन ला हजर राहण्यास सांगितले .त्यानंतर डॉ रेवनने अकोले पोलीस स्टे . येथे आपला जबाब नोंदवला.परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही . त्यानंतर १६ नोव्हेबर रोजी संतप्त नातेवाईक नी गणोरे येथील जिथे चिट्टी लिहून आत्महत्या केली ते ठिकाण गाठले.परंतु हॉस्पिटल बंद होते आणि डॉक्टर रेवण तिथे उपस्तिथ नसल्याने श्रीपाद रूरल हॉस्पिटल समोर बसून ठिय्या आंदोलन सुरु केले .कायदा सुवेवस्था प्रश्न निर्माण होऊ नाही या करणास्तव पी एस आय विनोद खांडबहाले टीम सह गणोरे येथे हजर झाले

     नातेवाईक यांनी तुमचे म्हणणे अकोले पोलीस स्टेशन येथे द्या आम्ही पुढील कार्यवाही करू अशी विनंती पोलीस करू लागले परंतु .डॉ रेवण समोर येत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून उठणार नाही असा पवित्रा नातेवाईक यांनी घेतला .नंतर समजूत काढून नातेवाईक अकोले पोलीस स्टेशन येथे हजर झाले फिर्यादी संकेत कानवडे नी [१६नोव्हेंबर ] डॉरेवण विरोधात जबाब दिला .अकोले पोलिसाकडून आस्वासन दिले गेले कि आम्ही लवकरच डॉ रेवण वाकचौरे वर कार्यवाही करू .

      त्यानंतर डॉक्टर रेवण ला पोलीस स्टेशन ला हजर राहण्यास सांगितले परंतु डॉ रेवण हजर झाला नाही ना त्याच्याविरोधात कुठली कार्यवाही झाली त्यानंतर डॉक्टर रेवण फरार झाला आणि मोबाईल हि बंद असल्याची माहिती अकोले पोलिसांकडून समजली .❗
   

 डॉक्टर रेवण ला अकोले पोलीस वाचवण्याचे काम करत आहे असे आरोप मयत जगनाथ कानवडे चे नातेवाईक करत आहे. नातेवाईक यांनी अजून बरेच आरोप केले असून आम्हाला विस्वासात घेऊन जबाब नोंदवला कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

अकोले पोलिस डॉ रेवण ला वाचवत आहे .. मयत नातेवाईकांचा आरोप 

  ✍️ परिणामी काहीच कार्यवाही केली गेली नाही .उलट ज्या दिवशी आम्ही गणोरे येथे जाणार त्यादिवशीच नेमका डॉ रेवण हा हॉस्पिटल बंद करून कसा फिरायला गेला. स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये फाशी घेतली तरी डॉ रेवण ला त्याचे गांभीर्य नाही तो फिरायला गेला

 

. तो फिरायला गेला नसून त्याला कोणीतरी सांगितले कीं तू गायब हो हॉस्पिटल समोर आंदोलन होत होत तरी . एक psi दर्जाचा अधिकारी असून त्यांनी डॉ रेवण ला कॉल करून हजर राहा असे सांगून त्याने खांडबहाले साहेब ना मी उद्या येणार आहे असे उत्तर दिले

     त्यावर अकोले पॉलिसीची कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही यावरून अकोले पोलीस हे रेवण ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप मयत कानवडे यांच्या नातेवाईक यांनी केला आहे

     जबाब दाखल झाल्यानांत डॉ रेवण हा फरार होता पाच सहा दिवस मोबाइल स्विच ऑफ होता मग जेव्हा अकोले पोलिसाची [२३ नोव्हे ]गाडी गणोरे गावात दाखल झाली तेव्हा पोलिसानी हॉस्पिटल मध्ये जाऊन पाहिले नाही आत डॉक्टर रेवण आहे कि नाही . तसेच टीम माघारी फिरली . त्यानंतर डॉक्टर रेवण चे बंद असलेले मोबाईल सुरु झाले आणि हॉस्पटल मध्ये डॉक्टर रेवण लोकांना दिसू लागला . मग पोलीसांची टीम त्यादिवशी गावात येऊन असं काय सांगून गेली कि डॉक्टर रेवण ला कार्यवाहीची भीती राहिली नाही. या मागे पोलीस डॉ रेवण ला वाचवत आहे असे आरोप मयत जगन्नाथ कानवडे चे नातेवाईक करत आहे

  डॉक्टर रेवण वर अकोले पोलीस कार्यवाही करणार नसेल तर आम्ही अहिल्यानगर येथील एसपी कार्यालय येथे जाऊन आमरण उपोषण करणार आहोत आणि जो पर्यंत डॉक्टर रेवण ला यात सहआरोपी करत नाही तो पर्यंत आमरण उपोषण करणार अशी मयत कानवडे यांच्या नातेवाईक यांनी मीडिया ला दिली आहे

 

             अकोले पिएसआय खांडबहाले याना डॉ रेवण यांच्या कार्यवाही बाबत विचारले असता … आमच्याकडे फिर्यादी संकेत कानवडे यांचा पुरवणी जबाब मिळाला आहे या आधी डॉक्टर रेवण चा जबाब आम्ही नोंदवुन घेतला असून पुरवणी जबाबाच्या आधारे डॉ रेवण ला आम्ही तपासकामी पोलीस स्टे मध्ये हजर रहा असे सांगितले आहे डॉक्टर रेवण चा मोबाईल बंद असून संपर्क होत नव्हता परिणामी आम्ही गणोरे येथील श्रीपाद रूरल हॉस्पिटल मध्ये गेलो असता रेवण चा भाऊ बाळू वाकचौरे याना डॉ रेवण कुठे गेले आहे पो स्टे हजर का झाले नाही अशी विचारणा केली असता त्याने डॉ रेवण हे बाहेर गेले आहे मी दुपारी त्यांना पोलीस स्टे ला पाठवून देतो असे सांगितले अद्याप डॉ रेवण पोलीस स्टेशन ला हजर झाले नसुन हजर झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करू .
      —पीएसआय -खांडबहाले


हे हि वाचा⊗  यावर क्लिक करा 👇

जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरण:आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे चा अटी आणि शर्ती सह (interim) तात्पुरता जामीन मंजूर. स्टार 1 न्युज मराठी कडे या गुन्ह्यासंदर्भात कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध तात्पुरता जामीन आणि नियमित जामीन काय आहे फरक ?


 

          🔴आरोपी शेखर वाकचौरे आणि आरोपी संदीप वाकचौरे यांचा तात्पुरता जामीन झाला असून ८ नोव्हेंबर ला हायकोर्ट औरंगाबाद या ठिकाणी आम्ही आरोपी विरोधातील पुरावे तसेच आरोपी शेखर आणि संदीप वाकचौरे विरोधात असणारे स्ट्रॉंग पुरावे तसेच गुन्हा संदर्भातील कॉल रेकॉर्डिंग चे पुरावे फॉरेन्सिक लॅब टीम समोर पंचनामे करून आम्ही सर्व पुरावे हायकोर्ट मध्ये देऊ आरोपींचा जामीन हा कॅन्सल होणार असून त्यांना कायमस्वरूपी जामीन भेटणार नाही .बाकी पुरावे गोळा करण्याचे काम सुरु असून तपासावर कोणी शंका घेऊ नये .

पि आय बोरसे .अकोले पोलीस स्टेशन
पि आय बोरसे .अकोले     पोलीस स्टेशन 

 

 

        जेव्हा फिर्याद दाखल केली तेव्हा नावे असलेली चिट्ठी सोडून बाकी काही पुरावे नव्हते परंतु गुन्हा संबंधी काही कॉल रेकॉर्डिंग अकोले पोलीस तसेच स्टार वन न्युज मराठी च्या हाती लागल्या आहे . रेकॉर्डिंग मुळे यातील आरोपी हे सुटणार नाही हे नक्की. मयत जगन्नाथ कानवडे याने ज्यादिवशी आत्महत्या केली त्याचे पाच ते सहा दिवस अगोदर तसेच काही तास अगोदरचे कॉल रेकॉर्डिंग मध्ये स्वतः मयत जगन्नाथ कानवडे हा दुसऱ्या व्यक्तीला सांगतोय   कि माझी जगायची

     इच्छा नाही मला शेखर ,संदीप ,आणि रमेश वाकचौरे नि खुफ त्रास दिला आहे मी सगळ्यांची नावे लिहून ठेवनार आणि चालू असणाऱ्या कामावर मी फासी घेणार मी मेल्यावर एकालाही सोडू नका .यांचे तुकडे तुकडे करा आणि डुकरांना खाऊ घाला पण एकालाही सोडू नका . संदीप शेखर आणि रमेश वाकचौरे कडे ज्या दिवशी मी पैसे मागायला गेलो त्यादिवशी मला मारहाण केली माझ्यासोबत भांडण केलं .

मी त्याचा कडे पैसे मागायला आता जाणार नाही ते पैसे त्यांना कृष्ण अर्पण पण मी पैन्ज देऊन सांगतो शेखर .संदीप आणि रमेश वाकचौरे हे त्यांच्या बंगल्यात केव्हाच सुखी राहणार नाही माझा तळतळाट त्याना . असे अनेक हृदय पिळटाऊन आणि आरोपी विरोधात चीड निर्माण करणारे संभाषण हाती लागले आहे.

 

           निश्चितच मयत जगन्नाथ कानवडे हे चांगले स्वभावाचे होते परंतु ज्या लोकांमुळे त्याना त्रास झाला त्याना जीव द्यावा लागला त्याना निश्चितच शिक्षा झाली पाहिजे आणि आरोपी शेखर आणि संदीप वाकचौरे विरोधात भक्कम पुरावे गोळा करून त्यांचा जामीन रद्द करून त्यांना अटक करणे गरजेचे आहे

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!