अकोले तालुक्यातील अहिल्यानगर जगन्नात कानवडे आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखलअहिल्यनगर: अकोले .जगन्नाथ संपत कानवडे यांची गणोरे येतील हॉस्पीटल चे बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी फाशी.. मृत्यू च्या दोन दिवस आधी शेखर

जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरणी पाच आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर तर आरोपी संदीप, व शेखर वाकचौरे चा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.फरार आरोपींना अजून अटक का नाही?कोर्टात काय काय घडले सविस्तर…

बाकी अटकपूर्व जामीन मंजूर आरोपींचे आरोप हे सौम्य स्वरूपाचे आहे तर संदीप ,शेखर व रमेश वाकचौरे यांचे आरोप बघता हे तिघेच जगन्नाथ कानवडे यांच्या आत्महत्येस थेट कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते 

वाचक –6 लाख 43 हजार
वाचक –6 लाख 43 हजार

Updated by– स्टार वन न्युज मराठी ✍️ 

❗13 नोव्हेंबर 2025❗

आकोले 🔴अहिल्यानगर 

गणोरेअकोले तालुक्यातील गणोरे येथील श्रीपाद रुरल हॉस्पिटल चे मालक रेवण वाकचौरे याचे नवीन हॉस्पिटल चे बांधकाम सुरू असून सुरू असलेल्या हॉस्पिटल च्या दुसऱ्या मजल्यावर 

 बांधकाम सुरू असून बांधकाम कारागिराने काही व्यक्तींच्या जाचाला तसेच कर्जाला कंटाळून (23 ऑक्टोबर ) रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती .

   आत्महत्या करणाऱ्या इसमाचे जगन्नाथ संपत कानवडे असे असून सदर इसम हा संगमनेर तालुक्यातील सावरचोळ , मेंगळवाडी येथील आहे तर हल्ली तो अकोले येथील महालक्ष्मी रोड येथे राहत होता.

  मृत्यूपूर्वी पोलीस निरीक्षकांना कानवडे याचे खिशात सुसाईड नोट मिळून आली. त्यात सात आरोपीविरुद्ध आरोप करण्यात आले. यामुळे यातील आरोपींनी

संगमनेर येथील न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले. त्यातील कळस बुद्रुक येथील आरोपी अशोक वाकचौरे, वीरगाव (आनंदगड) येथील आरोपी रावसाहेब वाकचौरे व दिनेश वाकचौरे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी ( 10 नोव्हेंबर) सुनावणी झाली. सोमवारी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी या तिन आरोपींचे अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने आरोपी वाकचौरे बंधूंना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

 

    🔴ऍडव्होकेट अनिलकुमार आरोटे व ऍडव्होकेट. अखिल आरोटे यांनी रावसाहेब व दिनेश वाकचौरे यांच्यासाठी, तर ऍडव्होकेट अनिकेत चौधरी यांनी आरोपी अशोक वाकचौरे याच्यासाठी काम पाहीले. 

तर सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट बी.जी. कोल्हे व फिर्यादीचे वकील म्हणून ऍडव्होकेट विठ्ठलराव गुंड यांनी कामकाज पाहिले.

  कोर्टात सरकारी वकिल ऍडव्होकेट बी.जी. कोल्हे यांनी कोर्टात आरोपींना जामीन मंजूर झाला तर कायदाच्या धाक राहणार नाही.ते तपासाला सहकार्य करणार नाही.. असा जोरदार युक्तिवाद केला 

परंतु फिर्यादी संकेत कानवडे यांचा एक जबाब आणि दोन्ही वाकचौरे बंधू ना जामीन मंजूर…

 फिर्यादी संकेत कानवडे चा बीएनएसएस कलम १८३ अन्वयेचा जबाब दि.३०/१०/२०२५ रोजी न्यादंडाधिकारी यांचे समक्ष नोंदविला. त्यामध्ये असे स्पष्ट आहे की, त्याचे वडीलांनी मृत्युपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये रावसाहेब वाकचौरे व दिनेश वाकचौरे यांचे देखिल नावे आहेत. परंतु त्या दोघांचे व्यवहार पाहणारे अनिल राहणे यांनी घटनेच्या दोन दिवसांपूर्वी शाळेच्या इमारतीचे बांधकामाचे पैसे दिले होते तथापी संकेतने कामाच्या गडबडीत ते त्याचे वडीलांना सांगितले नव्हते. असा प्रकारे संकेत कानवडे यांचा जबाब माननीय कोर्टा समोर ठेवण्यात आला 

तर आरोपी यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की 

जगन्नाथ यांनी आत्महत्या करावी असा अर्जदार/आरोपीचा सकृतदर्शनी हेतू असल्याचे दिसुन येत नाही. अर्जदार/आरोपी रावसाहेब वाकचौरे आणि दिनेश वाकचौरे तसेच मयत जगन्नाथ यांचे मधील व्यवहार दिवाणी स्वरुपाचा असून पैसे वसूलीचा कायदेशीर मार्ग जगन्नाथ यांना उपलब्ध होता. अर्जदारा/आरोपीच्या कोठडीतील चौकशीची आवश्यकता नाही.

 

हे सर्व निरीक्षण न्यायालयाने नोंदून वरील 3 आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला होता


तसेच 11 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपी संदीप, शेखर, रमेश वाकचौरे तसेच श्रीकांत आंब्रे यांचा जामीन अर्जावर सुनावली झाली 

 

त्या सुनावणी मध्ये आरोपी श्रीकांत आंब्रे यांचे वतीने ऍडव्होकेट धुमाळ साहेबाणी कामकाज पाहिले त्यात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री बी.जी कोल्हे यांनी आरोपी श्रीकांत आंब्रे यांच्या विरोधात अटकपूर्व जामीन होऊ नाही यामुळे जोरदार युक्तिवाद केला.

 

परंतु आरोपी श्रीकांत आंब्रे च्या बाजूने adv. श्री के डी धुमाळ वकिलांनी युक्तिवाद केला की 

 

 

अर्जदार/आरोपीचे केलेल्या कामाचे पैसे पिडीत जगन्नाथ कानवडे यांना पुर्णपणे प्राप्त झालेले नसले तरी जगन्नाथ यांनी आत्महत्या करावी असा अर्जदार/आरोपी श्रीकांत आंब्रे यांचा सकृतदर्शनी हेतू असल्याचे दिसुन येत नाही.

     अर्जदार/आरोपी श्रीकांत आंब्रे तसेच जगन्नाथ यांचे मधील व्यवहार दिवाणी स्वरुपाचा असून पैसे वसूलीचा कायदेशीर मार्ग जगन्नाथ यांना उपलब्ध होता

तसेच फिर्यादी/पिडीततर्फे त्यांचे सुविद्य वकील श्री. व्ही. एस. गुंड यांनी लेखी म्हणणे दिले नाही व युक्तीवाद देखिल केला नाही.

यावरून असे दिसते की श्रीकांत आंब्रे यांना जामीन न होऊ देण्याचा फिर्यादी यांचा कुठलाही अडथळा नाही 

अर्जदार / आरोपीच्या कोठडीतील चौकशीची आवश्यकता नाही. अटी व शर्तीना अधीन अटकपूर्व जामीन मंजुर करणे न्यायोचित राहील.

या सर्व बाबींचे माननीय 

  अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय मंदार नेरलेकर साहेबांनी 

निरीक्षण करून खालील अटी टाकून आरोपी श्रीकांत आंब्रे याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला 

🔴घालून दिलेल्या अटी ✍️

 

१–कोणत्याही स्वरुपाचा हस्तक्षेप करु नये व पुराव्यात छेडछाड व फेरफार करु नये. 

   २–आरोपी ने फिर्यादी तसेच साक्षीदार यांच्याशी कुठल्याही स्वरूपाचा संपर्क करू नये. धाक, दडपण, दबाव, प्रलोभन इत्यादी चा वापर करू नये 

 

३– दोषारोपपत्र दाखल होईपावेतो तपासी अधिकारी चौकशीसाठी बोलवतील तेव्हा अर्जदार/आरोपी क्र.५ श्रीकांत बाबासाहेब आंबरे यांनी संबंधीत पोलीस ठाण्यात हजर राहून तपासात सहकार्य करावे.


तसेच 11 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपी संदीप शेखर आणि रमेश वाकचौरे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली त्यांच्या बाजूने 

 

   🔴श्री. एस. यु. कवडे यांनी काम पाहिले त्यांनी कोर्टात युक्तीवाद केला की, गणोरे ते कोतुळ 50 किमी अंतर आहे. शव गणोरे येथून कोतूळला नेले. मृत्युपर्व चिठ्ठी फिर्यादी संकेत यांनेच समाज माध्यामांमध्ये फिरवली. 

सदर चिठ्ठीचे पहिले पान एका व्यक्तीने व दुसरे पान हे दुस-या व्यक्तीने लिहीले आहे. ❗❗

मयत जगन्नाथ कानवडे नैराशात गेला होता तर तो सुशोभित व पत्रासारखी भाषा असणारी मृत्युपुर्व चिठ्ठी लिहणार नाही. 

जगन्नात कानवडे व संदीप ,रमेश आणि शेखर वाकचौरे यांच्या मध्ये कुठलाही थेट व्यवहार नव्हता.

सर्वांचा जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद आरोपी च्या वकिलांनी केला ❗❗

त्यानंतर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री बी.जी कोल्हे यांनी 

 यावर जोरदार आक्षेप घेत जामीन अर्जाला विरोध करत युक्तिवाद केला की 👇👇

👇

प्रथमखबरमध्ये असून या तिन्ही आरोपी कडून जगन्नाथला रु.१३,४७,०००/- इतकी मोठी रक्कम येणे बाकी होती. जगन्नाथ कानवडे यांचा कामगार संदीप पिंगळे हा दि.१८/१०/२०२५ रोजी अर्जदारांकडे केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी जगन्नाथच्या वतीने गेले असता त्याला देखिल अर्जदारांनी शिवीगाळ करुन, मारहाण केली होती, असे सुध्दा आरोप प्रथमखबरमध्ये नमुद आहे. सदर आरोप अटकपूर्व जामीन मंजुर केलेल्या या गुन्हयातील अन्य आरोपींविरुध्द नाहीत.

बाकी अटकपूर्व जामीन मंजूर आरोपींचे आरोप हे सौम्य स्वरूपाचे आहे तर संदीप ,शेखर व रमेश वाकचौरे यांचे आरोप बघता हे तिघेच जगन्नाथ कानवडे यांच्या आत्महत्येस थेट कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते 

🔴✍️पोलीस तपासाचे कागदपत्रांमध्ये सुदाम पिंगळे यांचा दि.३०/१०/२०२५ रोजी पोलीसांसमोर झालेला जबाब वाचला असता त्यामध्ये असे नमुद आहे की, सुदाम पिंगळे हा जगन्नाथ कानवडे यांच्याकडे सेंट्रींगचे काम करतो.

  संदीप वाकचौरे, शेखर वाकचौरे आणि त्यांचे वडील रमेश वाकचौरे यांनी जगन्नाथ कानवडे यांचे पैसे थकवले होते, ते पैसे मागण्यासाठी जगन्नाथ त्यांच्याकडे गेला असता उपरोक्त नमुद वरील तीन जणांनी त्यांना मारहाण केली होती व पुन्हा पैसे मागितले तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. 

  

या तिघांनी जगन्नाथचे साहित्य देखिल लपवून ठेवले होते. त्यामुळे जगन्नाथ कायम चिंतेत असायचा. जगन्नाथ यांच्या सांगण्यावरून सुदाम पिंगळे हे दि. १८/१०/२०२५ रोजी संदीप, शेखर व रमेश वाकचौरे यांच्याकडे पैसे मागायला गेले असता त्यांनी सुदामला शिवीगाळ करुन मारहाण केली.

    पोलीस तपासाचे कागदपत्रांचा साकल्याने विचार करता सकृतदर्शनी असे निदर्शनास येते की, रु.१३,४७,०००/- इतकी मोठी रक्कम अर्जदार / आरोपींनी जगन्नाथ कानवडे यांचे थकवले. त्यांचेकडे जगन्नाथने पैश्यांची मागणी केली असता त्यास शिवीगाळ, मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली तसेच सेंट्रिंग चे काही सामना या वरील तिघांनी लपून ठेवले आहे तसेच 👇

हिशोबाची कागदपत्रे तसेच हिशोबवही ही गायब केली आहे 

✍️तसेच सरकारी वकिलांनी असा ही युक्तीवाद केला की या आरोपींमधे रमेश कारभारी वाकचौरे यांची 

सोबतची दवाखान्याची कागदपत्रे वाचली असता अर्जदार क्र.३ रमेश वाकचौरे यांचे वय ६५ असून ते कर्करोगाचे( Cancer) रुग्ण असून त्यांचेवर त्या कारणासाठी उपचार चालू आहेत. तसेच वय, आजार व त्यावरील चाललेले उपचार विचारात घेता त्यांना अटकपूर्व जामीन मंजुर करणे न्यायोचित ठरेल.

      फिर्यादी यांच्या वतीने वरील तिघांचा जामीन होऊ नाही यामुळे अर्ज देखील माननीय न्यायालयासमोर हजर केला होता तसेच फिर्यादी यांच्या वतीने ऍडव्होकेट श्री व्हि एस गुंड यांनी ही जामीन अर्ज मंजूर होऊ नाही या साठी जोरदार युक्तिवाद केला 

या युक्तिवाद चे निरिक्षण करता आरोपी रमेश वाकचौरे हे कर्करोगाचे( Cancer) रुग्ण असून आजाराने त्रस्त आहे त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला 

  🔴✍️तसेच आरोपी संदीप वाकचौरे आणि शेखर वाकचौरे यांचा अटकपूर्व जामीन ना मंजूर करण्यात आला आहे.

सध्या आरोपी संदीप वाकचौरे आणि शेखर वाकचौरे हे फरार असून पोलीस नी यांचा CDR डेटा मिळून त्यांना पळून लावण्यास कोणाचा हात आहे याचा तपास करावा तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करावी 

आता हे आरोपी हायकोर्ट औरंगाबाद या ठिकाणी जामीन मिळवण्यासाठी जातील परंतु पोलिसांनी त्यां आधीच तपास करून त्यांना ताब्यात घेऊन अटक करणे गरजेचे आहे..

आरोपी संदीप , शेखर रमेश वाकचौरे कडून 13 लाख रुपये एवढी रक्कम तसेच हिशोब वही अन्य सेंटरिंग समान हस्तगत करणे कामी आरोपी ना अटक करणे गरजेचे आहे त्याशिवाय कुठल्याही वस्तू हस्तगत होणार नाही आणि बाकी खरा तपास होणार नाही हे निश्चित 

 

आत्महत्येवेळी सापडलेली चिठ्ठी व इतर तपास करून काही आढळल्यास इतर कलमानन्व्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीसांनी दिली.

 

✍️तपास पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खांडबहाले व पोहेकॉ व्ही. जी. खाडे करीत आहेत.

 

 

By star one news Marathi ™

वाचक –6 लाख 43 हजार

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!