अकोले तालुक्यातील अहिल्यानगर जगन्नात कानवडे आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखलअहिल्यानगर ✍️ अकोले. गणोरे.आत्महत्या 👇 हत्यामहाराष्ट्र

जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरण:आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे चा अटी आणि शर्ती सह (interim) तात्पुरता जामीन मंजूर. स्टार 1 न्युज मराठी कडे या गुन्ह्यासंदर्भात कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध✍️ तात्पुरता जामीन आणि नियमित जामीन काय आहे फरक ?

आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे ची अटकपूर्व जामीनाची सुनावणी 8 डिसेंबर रोजी असल्याची माहिती अकोले पोलीसाकडून समजली असून आरोपी संदीप आणि शेखर यांचा जामीन होणार नाही त्यासाठी आम्ही कोर्टात आमचे म्हणणे दाखल करू....PSI श्री खांडबहाले साहेब

✍️Updated by स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा™
  20 नोव्हेंबर 2024

अकोले 🔴अहिल्यानगर  (जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरण )

गणोरे अकोले तालुक्यातील गणोरे येथील श्रीपाद रुरल हॉस्पिटल चे मालक रेवण वाकचौरे याचे नवीन हॉस्पिटल चे बांधकाम सुरू असून सुरू असलेल्या हॉस्पिटल च्या दुसऱ्या मजल्यावर 

 बांधकाम सुरू असून बांधकाम कारागिराने काही व्यक्तींच्या जाचाला तसेच कर्जाला कंटाळून (23 ऑक्टोबर ) रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती .

    आत्महत्या करणाऱ्या इसमाचे जगन्नाथ संपत कानवडे असे असून सदर इसम हा संगमनेर तालुक्यातील सावरचोळ , मेंगळवाडी येथील आहे तर हल्ली तो अकोले येथील महालक्ष्मी रोड येथे राहत होता.

     मृत्यूपूर्वी पोलीस निरीक्षकांना कानवडे याचे खिशात सुसाईड नोट मिळून आली. त्यात सात आरोपीविरुद्ध आरोप करण्यात आले. यामुळे यातील आरोपींनी संगमनेर येथील न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले
यातील सात आरोपी पैकी पाच आरोपींना संगमनेर येथील न्यायालयायाने अटकपूर्व जामीन मंजूर केला
तसेच आरोपी संदीप वाकचौरे आणि शेखर वाकचौरे यांचा अटकपूर्व जामीन ना मंजूर करण्यात आला आहे.

त्यानंतर आरोपी शेखर आणि संदीप वाकचौरे फरार होते पोलिसा कडून शोधाशोध घेऊन आरोपी चा ठाव ठिकाणा लागला नाही..
त्यानंतर आरोपी नी अटकपूर्व जामीन साठी हायकोर्ट मध्ये अपील केले

आरोपी च्या वतीने हायकोर्ट मध्ये तात्पुरता जामीन मिळावा यासाठी अपील (17 नोव्हेंबर) दाखल करण्यात आले

हायकोर्ट कडून आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे पुढील अटकपूर्व जामीनाची सुनावणी होईपर्यंत 8 डिसेंबर 2024 पर्यंत तात्पुरता जामीन दिला असून पुढील आदेश पारित करे तोपर्यंत पोलिस अटके पासून संरक्षण दिले असून पुढील आदेश येईपर्यंत अकोले पोलिस आरोपी ना अटक करू शकत नाही   

   न्यायालयाने अटी आणि शर्ती सह दोन्ही आरोपी ना तात्पुरता ( interim)

    जामीन मंजूर केला आहे       

   

 आरोपीं संदीप आणि शेखर वाकचौरे ना दर गुरुवारी अकोले पोलिस स्टेशन येथे हजेरी लाऊन आरोपींनी पोलिसांना तपासात सहकार्य तसेच पोलिस तपासा साठी बोलवेल तेव्हा पोलिस स्टेशन येथे हजर होणे तसेच फिर्यादी यांना दबाव न आणणे अशा अटी आणि शर्ती सह आदेश पारीत केला आहे.

अशी माहिती अकोले पोलिस स्टेशन येथील PSI श्री खांडबहाले साहेब यांनी दिली.
__________________________________________

  •       जेव्हा एखाद्या आरोपीला कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक केली जाते, तेव्हा तो अंतरिम जामीन, जामीन आणि अटकपूर्व जामीन यासाठी अर्ज करू शकतो. पण अंतरिम जामीन, जामीन आणि अटकपूर्व जामीन या नेमका काय फरक आहे, असा आपल्याला नेहमी पडतो. अंतरिम जामीन, जामीन आणि अटकपूर्व जामीन यामध्ये नेमका काय फरक आहे, आज आपण जाणून घेऊया.

INTERIM BAIL What does it mean? तात्पुरता (अंतरिम –INTERIM) जामीन म्हणेज काय?👇



हे ही वाचा येथे क्लिक करा—– गणोरे:डॉक्टर रेवन च्या विरोधात  पुरवणी जबाब दाखल.मयत कानवडे चे नातेवाईक आक्रमक. हॉस्पिटल समोर ठिय्या,आरोपी संदीप व शेखर वाकचौरे हे घरात लपून असल्याचा संशय.नातेवाईकांचा घराला घेराव


    तात्पुरता जामीन म्हणजे अल्प मुदतीसाठी दिला जाणारा जामीन, जो नियमित जामीन किंवा अटकपूर्व जामिनावर निर्णय होईपर्यंत आरोपीला कोठडीतून बाहेर काढतो. हा जामीन न्यायालयात अर्ज केलेल्या मुख्य जामिनाच्या प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्यामुळे दिला जातो, जेणेकरून आरोपीला तात्काळ दिलासा मिळू शकेल.


🌍 तात्पुरता जामीन कालावधी: हा जामीन अल्प मुदतीसाठी असतो आणि त्याची मुदत संपल्यानंतर आरोपीला पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते.

अर्ज: जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक होण्याची शक्यता असते किंवा अटक होण्याची शक्यता असते, तेव्हा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला जातो. या अर्जावर सुनावणी होईपर्यंतचा काळ हा तात्पुरत्या जामिनाचा कालावधी मानला जातो.

⭐प्रक्रिया: सामान्यतः उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय यांच्याकडून तात्पुरता जामीन मंजूर केला जातो. या प्रक्रियेत, कनिष्ठ न्यायालयाकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ लागतो. या वेळेत आरोपीला तात्पुरता जामीन मिळतो.

अटी: हा जामीन काही अटींवर अवलंबून असतो आणि या अटींचे पालन करणे बंधनकारक असते.

 

✍️✍️सामान्य जामिनावर निर्णय✍️✍️

❗जेव्हा एखादी व्यक्ती नियमित जामीन किंवा नियमित जामीनासाठी अर्ज दाखल करते, तेव्हा न्यायालय या प्रकरणात आरोपपत्र किंवा केस डायरीची मागणी करते जेणेकरून सामान्य जामिनावर निर्णय घेता येईल.
नियमित जामिनावर कोर्ट पोलिसांचे तसेच फिर्यादींचे म्हणने मागते पोलिस कोर्ट मध्ये आरोपींची पोलिस कस्टडी ची मागणी करते त्यानंतर नियमित सुनावणी होते सरकारी वकिलांचे आणि आरोपी वकिलांच यात युक्तिवाद होतो . दोन्ही बाजूचे म्हणजे ऐकून तसेच सेशन कोर्टाने या आरोपींचा आधी अटकपूर्व जामीन का नाकारला यावर हायकोर्ट निरक्षण करून
त्यानंतर माननीय न्यायालय निर्णय घेत

की आरोपीच्या अटकेची गरज आहे की नाही

त्यानंतर. आरोपींची अटकेची गरज असेल तर माननीय न्यायालय आरोपींचा अंतरिम जामीन रद्द करून आरोपीना पोलिसांनी अटक करावी असा आदेश देते

    जामीन झालेले आरोपी यांच्यावर जेवढे आरोप आहे त्यापेक्षा गंभीर आरोपी हे आरोपी संदीप, शेखर आणि रमेश वाकचौरे यांच्यावर आहे.
रमेश वाकचौरे यांचा अटकपूर्व जामीन झालेला आहे.


    आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे ची अटकपूर्व जामीनाची सुनावणी 8 डिसेंबर रोजी असल्याची माहिती अकोले पोलीसाकडून समजली असून आरोपी संदीप आणि शेखर यांचा जामीन होणार नाही त्यासाठी आम्ही कोर्टात आमचे म्हणणे दाखल करू. ..PSI श्री खांडबहाले साहेब

   आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे यांच्याकडील मयत जगन्नाथ कानवडे यांच्याकडील असलेले चोरी करून ठेवलेले समान तसेच पैसे हस्तगत करणे कामी आणि बाकी चौकशीसाठी आम्हाला आरोपी ना अटक करणे गरजचे आहे अशी माहिती अकोले पोलिसांकडून मिळाली आहे.

 

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!