
Updated by स्टार वन न्युज मराठी ™
8 ऑक्टोबर 2025

नाशिक ✍️🔴 सिन्नर ✍️
✍️नळवाडी❗सिन्नर तालुक्यातील नळवाडी गावातील जागरूक देवस्थान नळराज ऋषी गडावर कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शन घेतले .मंदिरावर अतिशय सुंदर लाईटींग रोशनाई तसेच सजावट केली होती. परिसर साफ सफाई करून. समोर रांगोळी ने सजावट करण्यात आली असल्याने मंदिराला भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले होते.कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने ह.भ.प प्रकाश महाराज आव्हाड यांचे किर्तन ठेवण्यात आले होते त्यानंतर गायघाट मंडळातर्फे महाप्रसाद आयोजित केला गेला. अनेक भाविकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ,,,,,,,,,,,,,,
✍️✍️सिन्नर तालुक्यातील नळवाडी गावातील जागरूक देवस्थान नळराज ऋषी गडावर कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने हजारो भाविकांनी घेतले दर्शन संतोष भाऊ घुले यांची कन्या विधी ने सांगितला ऋषीबद्दल आलेला अनुभव.
↓


✍️दिवसेनदिवस भाविकांचा ओघ नळराज ऋषी गडावर वाढत चालला आहे. किर्तन ऐकण्यासाठी अनेक तरुण मुले मुली तसेच महिला, पुरुष अनेक भाविक उपस्थित होते..

अनेक भक्तगण या ठिकाणी येऊन नवस करतात आणि तो नवस पूर्ण ही होतो. अशी या गावातील लोकांची श्रद्धा आहे.
✍️या गावावर आलेलं संकट हे ऋषी दूर करतात आणि यदाकदाचित कोणते संकट येणार असेल तर ते येत नाही अशी येतील भाविक भक्ताची श्रद्धा आहे

सिन्नर तालुक्यातील जागरूक देवस्थान नळराज ऋषी गड या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नळराज ऋषी यांनी तप केलं येथुन ते दररोज घोड्यावर नाशिक ला गंगे मध्ये स्नान करण्यासाठी जायचे

परतू काही कालांतराने त्यांना नाशिक येथील गंगे ला स्नान करण्यास जाता येत नव्हते तेव्हा गंगा माता ऋषींना प्रसन्न होऊन बोलली मी तुमच्या सोबत येते तुम्ही जेथे मागं बघाल तेथे मी उगम पावेल तेव्हा ऋषींनी चास व नळवाडी हद्दीमध्ये मागे बघीतले.

तेव्हा गंगा खडकांमध्ये उगम पावली आज श्री क्षेत्र पाताळेश्र्वर मंदीरासमोर गंगा बारमाही वाहत असते नळवाडी गावाला नळराज ऋषी मुळे नळवाडी नाव पडले येथे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी झेंडा मिरवणूक असते, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रम होतो ऋषी पंचमी निमित्ताने कार्यक्रम होतो, गणपती सुध्दा बसवला जातो कोजागिरी पौर्णिमा साजरी होते,दर गुरुवारी रात्री 9 वाजता आरती व स्नेह भोजन करण्यासाठी भाविक गडावर न चुकता जातात.


विशेष म्हणजे दर गुरुवारी कोल्हे,खोकड हे न चुकता हजेरी आरती चालू असताना असेच स्नेह भोजन चालू असताना हजेरी लावतात व त्यांना सुध्दा भोजन दिले जाते .
गडावर कोल्हे हजेरी लावताना ✍️
✍️गडावर सर्व विकास कामे हे सर्व भाविकांच्या सहकार्याने होत असतात दिवसेनदिवस हजारो भाविक या ठिकाणी येतात संपूर्ण परिसर हे स्थान श्रध्दा म्हणून ओळखले जातं येथे केलेला संकल्प नळराज ऋषींच्या आशिर्वादाने पुर्ण होतो तेव्हा या गडाला खुप असं महत्व प्राप्त आहे एक वेळेस सहकुटुंब नक्की दर्शनासाठी या तेव्हा आपलं मन प्रसन्न झाल्या शिवाय राहणार नाही
- संपादक ✍️ सचिन रेवगडे


