
By स्टार वन न्युज मराठी ™ | Updated: October 20, 2025 11:43 IST
छत्रपती संभाजी नगर ✍️ googleNews
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे आता छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले आहे. शासनातर्फे याबाबत अधिसूचना काढली आहे. यासाठी खा. डॉ. भागवत कराड यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. नामकरणाबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर हा निर्णय झाला आहे.

राज्यात २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला. केंद्रानेदेखील निर्णयाला मान्यता दिली. त्यानंतर महसूल आणि वनविभागाने २४ फेब्रुवारी रोजी प्रारूप अधिसूचना काढून औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ असे केले. सप्टेंबर २०२३ मध्ये विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर विभाग असे करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी नामफलकाचे तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनावरण झाले.
मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या औरंगाबाद व उस्मानाबाद नामकरणाला अखेर केंद्राने हिरवा झेंडा दाखविला होता. मात्र, रेल्वे स्थानकाचे नामकरण झालेले नव्हते. मराठवाड्यातील औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव धाराशिव, असे करण्याचा निर्णय झाल्यानंतर आजवर सर्व टप्प्यांवर प्रशासकीय यंत्रणेतील जुनी नावे बदलली




