Updated by स्टार वन न्युज मराठी ™
16 ऑक्टोबर 2025🌍
🌍महाराष्ट्र
मालेगाव (नाशिक) : एमडी ड्रग्सची तस्करी केली जात असल्याचे अनेक उघडकीस आले आहे. अशात मालेगावमध्ये देखील ड्रग्स तस्करी केली जात असल्याचे समोर आले असून मालेगाव शहर पोलिसांनी अवैधरित्या अंमली पदार्थ एमडी पावडरची विक्री करणाऱ्या तस्करांवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

✍️नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार मालेगावात सदरची कारवाई झाली आहे. यात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हीरापुर मैदान परिसरात काही इसम एम.डी. पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी परिसरात सापळा रचत सदर ठिकाणी छापेमारी केली.
. ✍️. ड्रग्स जप्त करत तिघेजण ताब्यात
मालेगावच्या किल्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिन्ही आरोपींकडून सुमारे ५ लाख ८२ हजार २०० रुपये किमतीचा १४५ ग्रॅम एम.डी. पावडर जप्त करण्यात आली. या कारवाईत अल्ताफ इब्राहिम मुईन अहमद (वय २९), जलाल अहमद मोहम्मद हनीफ शेख (वय ३२), मोसीन खान नैनुल्ला खान (वय ३७) या तिघांना ताब्यात घेतले असून चौथा आरोपी परचेन सध्या फरार आहे. या प्रकरणी किल्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक मध्यवर्ती कारागृह बनला गुन्हेगारांचा अड्डा?
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून यात कारागृहातील गांजा पार्टीच्या नावाने व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात कारागृहातील एका बॅरेकमध्ये गुन्हेगारांची गांजा पार्टी सुरु असून गांजा पार्टीचा व्हिडीओ मोबाईल मध्ये चित्रित झाला आहे. यामुळे कारागृहामध्ये गांजा आणि मोबाईल कसा गेला? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर सदरचा व्हिडिओ कधीचा आणि केव्हाचा आहे, याचा शोध कारागृह पोलिसांकडून घेतला जात आहे.





