
Updated by ✍️ स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा MH
29/10/2025
✍️अकोले –(जि–अहिल्यानगर) तालुक्यातील गणोरे येथील श्रीपाद रुरल हॉस्पिटल चे मालक रेवण वाकचौरे याचे नवीन हॉस्पिटल चे बांधकाम सुरू असून सुरू असलेल्या हॉस्पिटल च्या दुसऱ्या मजल्यावर
बांधकाम सुरू असून बांधकाम कारागिराने काही व्यक्तींच्या जाचाला तसेच कर्जाला कंटाळून (23 ऑक्टोबर ) रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती .
✒️आत्महत्या करणाऱ्या इसमाचे जगन्नाथ संपत कानवडे असे असून सदर इसम हा संगमनेर तालुक्यातील सावरचोळ , मेंगळवाडी येथील आहे तर हल्ली तो अकोले येथील महालक्ष्मी रोड येथे राहत होता.. मयत जगन्नाथ कानवडे यांनी मरणा अगोदर ज्या लोकांपासून त्रास होत होता. ज्या लोकांकडून कामाचे पैसे घेणे होते त्यांची नावे त्या चिट्टी मधे लिहून आत्महत्या केली होती
दरम्यान अंत्यविधी झाल्यानंतर सुद्धा कोणी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यास येत नव्हते.
✍️पाच दिवस उलटून ही गेले होते परंतु कोणी फिर्याद देण्यास येत नव्हते. परिणामी अकोले पोलिस ऍक्शन मोड वर आले होते त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
- अकोले PSI खांडबहाले साहेब 27 तारखेला पुन्हा आत्महत्या केली त्या ठिकाणी पंचनामा करण्यास आले होते. तेव्हा काही डॉक्टर रेवण वाकचौरे तसेच अन्य आरोपींना दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशन येथे चौकशी कामी हजर रहा म्हणून सांगितले होते परंतु कोणी ही हजर झाले नव्हते.

जर कोणी फिर्याद देण्यास आले नाही तर पोलिसांपुढे पर्याय होता स्वतः पोलिस फिर्यादी होऊन गुन्हा नोंद करून घेऊन पुढील कार्यवाही करणे. परंतु आज 28 ऑक्टोबर रोजी मयत जगन्नाथ कानवडे चां मुलगा संकेत जगन्नात कानवडे
याने पोलिस ठाण्यात हजर राहून 7 जणांविरोधात
गुन्हा रजिस्टर नंबर 531/2025
🔴कलम
(2023 भारतीय न्यायसंहिता (BNS) –108
(2023 भारतीय न्यायसंहिता (BNS)– 115(2)
(2023 भारतीय न्यायसंहिता (BNS)– 351(2)
(2023 भारतीय न्यायसंहिता (BNS)– 352
नुसार तक्रार दाखल केली असून ….
🔴त्याची थोडक्यात हकीकत अशी की…. ✍️
- ✒️मी संकेत जगन्नात कानवडे (सिविल इंजिनिअर) (वय 24 ) अकोले पोलिस स्टेशन येथे हजर राहून फिर्याद देतो की 23/10/2025 रोजी मी सायंकाळी 7 वाजता आत्याकडे गेलो होतो तेव्हा मला पप्पा चे दोन ते तीन कॉल आले परंतु मी गाडी चालवत असताना मला कॉल आलेले समजले नाही मी काही वेळानंतर त्यांना कॉल करून आता तुम्ही कुठे आहे विचारले असता मी आता कुठे आहे सांगू शकत नाही असे बोलून फोन ठेऊन दिला. या आधी ते असे केव्हाच बोलले नाही असे बोलल्याने मी घाबरून गेलो. तेव्हा मी आत्या च्या घरी बसलो होतो मला मोबाईल वर काही नोटीफॅक्शन आल्याने मी मोबाईल ओपन करून पाहिला असता त्यात दोन पानी मजकूर दिसला तो वाचून पाहिला त्यामध्ये ठेकेदारीचे केलेल्या कामाचे पैसे त्यांना मिळाले ले नव्हते
त्यामध्ये आरोपी क्रमांक…..
🕳️1 ) संदीप रमेश वाकचौरे(रा,गणोरे)
🕳️2) शेखर रमेश वाकचौरे( रा.गणोरे
🕳️3) रमेश कारभारी वाकचौरे (रा.गणोरे)
🕳️4) अशोक वाकचौरे( रा.कळस)(धीरज ऍग्रो)
🕳️5) श्रीकांत आंब्रे( रा.गणोरे)
🕳️6) रावसाहेब वाकचौरे, (रा.वीरगाव)
🕳️ 7) दिनेश वाकचौरे, (रा.वीरगाव )
✍️यांचे माझ्या वडिलांनी ठरले प्रमाणे सेंट्रिंग ठेकेदारीचे कामे केले असून केलेल्या कामाचे ठरले प्रमाणे पैसे मिळाले नसल्याने माझ्या वडिलांनी आत्महत्या केली आहे. असे मला पाठवलेल्या सुसाइड नोटवरून समजले होते.
✍️यात अशोक वाकचौरे, कळस (धीरज ऍग्रो)याने याचे काम करत असताना त्यांनी चालू कामाचे काही पैसे दिले आहे. तसेच श्रीकांत आंब्रे रा. गणोरे हा कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी डॉक्टर रेवणनाथ वाकचौरे यांचे हॉस्पिटल चे कामे घेतलेले आहे. त्यात माझे वडील सेंटरिंग काम करत होते त्यात श्रीकांत आंबरे नी वडिलांना फक्त लेबर पेमेंट दिलेल असून चालू कामाचे पैसे माझा वडिलांना दिलेले नाही
हे ही वाचा 👇 यालिंक वर क्लिक करा 👇
सात आरोपींवर गुन्हा–आत्महत्ये पूर्वी लिहून ठेवली होती चिट्टी 🔴 🔴हे पत्र वरील स्तरावर जावे आणि मला न्याय मिळावा…..🔴
__________________________________________
परंतु संदीप वाकचौरे, शेखर वाकचौरे,रमेश वाकचौरे, हे सर्व राहणार गणोरे ता. अकोले या तीन लोकांकडे माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचे 18/10/2025 रोजी ….
13,47,000 रुपये ची मागणी करण्यास त्यांच्या घरी गेलो असता वरील सर्व वाकचौरे नि माझ्या वडीलांना शिवीगाळ तसेच मारहाण करत वडिलांना म्हणले आमच्या पुढे फाशी जरी घेतली तरी तुला पैसे मिळणार नाही. त्यामुळे माझे वडील घाबरून जाऊन पोलिस स्टेशन ला तक्रार केली नव्हती
त्यांना झालेली मारहाण बाबत त्यांनी मला सांगितलेले होते..❗
✍️✍️केलेल्या कामाचे पैसे न भेटल्याने आणि घेतले कर्ज न फेडता आल्याने माझे वडील सतत टेन्शन मधे राहत होते व जेवण करत नव्हते. शेवटी सर्वांच्या जाचाला कंटाळून त्यांचे नावे सुसाइड नोट लिहून 23/10/2025 रोजी आत्महत्या केली आदी मजकुरा सह अकोले पोलिस स्टेशन (अहिल्यानगर) येथे 28/10/2025 रोजी फिर्याद दाखल केली असून
🔴तातडीने पी आय बोरसे साहेब यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी ना पकडण्यासाठी टीम रवाना केली होती परंतु सर्व आरोपी फरार झाले होते .
🌍मयत जगन्नाथ कानवडे यांना वाकचौरे यांनी मारहाण तसेच शिविगाळ ज्या दिवशी झाली त्यादिवशी तिथे काही मजूर होते त्यांची चौकशी करून जबाब अकोले पोलिस नि घ्यावा..
हा गुन्हा गंभीर असून तपास पारदर्शी केला जाईल आणि मयतास न्याय मिळून देण्याचा प्रयत्न अकोले पोलिस करतील असे आश्वासन पी आय बोरसे साहेब यांनी दिले असून आरोपींचा शोध सुरू आहे.जर आरोपी ना पळून लावण्यास कोणी मदत करत असेल तर त्यांना ही सहआरोपी करू अशी माहिती पोलिस निरीक्षक बोरसे साहेब यांनी दिली आहे.. आरोपी ना लवकरात लवकर पकडून न्यायालयात हजर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.
गुन्ह्याचा तपास अकोले पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक बोरसे बोरसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सबइन्स्पेक्टर (PSI) खांडबाहाले साहेब हे करत आहे.
✍️✍️पुढील काय कार्यवाही होते आरोपी लवकरात लवकर अटक होतील का मयतास न्याय मिळेल का असे अनेक प्रश्न अकोले अकोले तालुक्यातील जनतेस पडलेले आहे..
By स्टार वन न्युज मराठी ™

