
Published by ✍️Star one news marathi
5 सप्टेंबर 2025

निघोज. / प्रतिनिधी–
योगेश खाडे 📱 +917020898588
निघोज 🌍 राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांचे समाजाभिमुख काम मोठे असून निघोज पंचायत समिती गणातील गणपती मंडळांना भेटी देऊन त्यांनी मंडळाला सामाजिक कार्यला प्रेरणा दिली असल्याचे प्रतिपादन निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांनी व्यक्त केले आहे. राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवार दि.२ रोजी निघोज येथील मुलिका गणेशोत्सव मंडळ, ढवणवाडी येथील कानिफनाथ गणेश मंडळ तसेच परिसरातील गणेश मंडळांना सदिच्छा भेटी देऊन बाप्पाचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक

💫रामदास लंके, प्रकाश वराळ, राजूनाना उचाळे मंगेश लंके, प्रदीप लंके,शुभम उनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीपराव वराळ, धोंडीभाऊ शेळके सर, सुनिल उचाळे, रामदास उचाळे, हरिओम वराळ, विठ्ठलराव लंके, राहुल शेळके, अजय शेळके, सचिन उनवणे, संदीप लंके, विक्रम वराळ, रोहन उनवणे, पप्पू उचाळे, रवि उचाळे,ओम उचाळे, सात्विक उचाळे, सागर वराळ, विशाल वराळ, विशाल लंके, वैभव लंके, मल्हार लंके, वेदीका लंके, आयुष वराळ, स्वरांजली उनवणे, रेवा उनवणे , वंश वराळ प्रिशा शेळके ,आरोही शेळके ,पीयुष लंके, विराज लंके,काव्या लंके, अनु लंके, वेदिका लंके, इशिका वराळ , सानिका उचाळे ,तेजस्विनी उचाळे
आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच वरखडे यावेळी म्हणाले सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यात सरपंच कारखिले यांचे मोठे योगदान आहे. राळेगण थेरपाळ परिसर विकासाबरोबरच त्यांनी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यासाठी योगदान दिले आहे. यावेळी मंडळाचे पदाधिकारी मंगेश लंके व प्रदीप लंके यांनी मंडळाची माहिती दिली.
✍️या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे मार्गदर्शक दत्तात्रय उनवणे यांनी केले. रवी उचाळे व ओम उचाळे यांनी आभार मानले.