Published by ✍️ Star one news marathi
9 सप्टेंबर 2025 
- 🔴निघोज / प्रतिनिधी ✍️
- योगेश खाडे 📱 +917020898588

निघोज ✍️
शेतकरी हिताचे निर्णय घेत निघोज सोसायटीने गेली साडेचार वर्षे कारभार करीत पारदर्शक कामकाज करीत शेतकऱ्यांचा विकास केला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार व सोसायटीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ठकारामशेठ लंके यांनी व्यक्त केले आहे.
निघोज सोसायटीची ७४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन सुनिल वराळ यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी मार्गदर्शन करताना लंके बोलत होते. यावेळी सचिव रामदास भोसले यांनी अहवालवाचन केले सर्व विषय सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केले. संस्थेचे उपाध्यक्ष संतोष लामखडे, संचालक दत्तात्रय लंके यांनी विषय वाचन करताना प्रत्येक विषयाची माहिती दिली. माजी सरपंच लंके यांनी सांगितले की गेली दोन पंचवार्षिक मध्ये खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना सोसायटी पदाधिकारी व संचालक मंडळाने राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना कशा मिळतील यासाठी प्रयत्न केले चेअरमन सुनिल वराळ,व्हा.चेअरमन संतोष लामखडे व सर्व संचालक मंडळ यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वयक ठेऊन पारदर्शक कारभार केला म्हणून शेतकऱ्यांबरोबर सोसायटीचा फायदा झाला आहे.
✍️✍️✍️

चेअरमन सुनील वराळ यांनी संस्था विकासाची माहिती देताना सांगितले की बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद, माजी सरपंच ठकारामशेठ लंके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने शेतकरी विकासासाठी उपक्रम राबविले आहेत. यावेळी रामदास वरखडे, दिलीप ढवण, शिवाजी लंके, शिवाजी डेरे, भाऊसाहेब वरखडे, शांताराम कळसकर, भास्कर कवाद, जिल्हा सहकारी बँकेचे अधिकारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. वार्षिक सर्वसाधारण सभेचे सुत्रसंचालन सोसायटीचे सचिव रामदास भोसले यांनी केले. शेवटी संचालक दत्तात्रय लंके यांनी आभार मानले.🌍
✍️संपादक ✍️ सचिन रेवगडे
📱 9623968773




