E-Paperक्राइमतलाठी अक्षय बिनीवाले व कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे . अटक महाराष्ट्र

⭐ शेतकऱ्याचा पैशांसाठी छळ; पैठण तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई,तलाठी अक्षय बिनीवाले व कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे अटक. ⭐ स्टार न्युज

Published by ⭐ star one news marathi 

छत्रपती संभाजी नगर ✍️

शेतजमिनीचे वाटणीपत्र तयार करून देण्यासाठी १० हजारांची लाच मागणारा कोतवाल व तलाठी, असे दाेघे एकाच वेळी एसीबीच्या सापळ्यात अडकले. सोमवारी दुपारी पैठण तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत तलाठी अक्षय बबनराव बिनीवाले (३०, रा. म्हाडा कॉलनी, पैठण) व कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे (३६, रा. आपेगाव) यांना अटक केली.

   

  तक्रारदाराची पैठण तालुक्यातील अगर नांदूरमध्ये गट क्रमांक ५८ मध्ये ५० आर सामायिक शेतजमीन आहे. त्यापैकी तक्रारदाराच्या नावे १६ आर जमीन आहे. २५ जुलै रोजी त्यांनी जमिनीच्या वाटणीपत्रासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्याच्यावर नंतर काहीच कारवाई झाली नाही. १ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने कोल्हेकडे विचारणा केली. तेव्हा वाटणीपत्र करून देण्यासाठी त्याने बिनीवालेच्या नावाने १० हजारांच्या लाचेची मागणी केली. शेतकऱ्याने एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली. कांगणे यांनी पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांना खातरजमा करून कारवाईच्या सूचना केल्या

  गमछा  खांद्यावरून काढताच झडपनिरीक्षक चैनसिंग गुसिंगे, धर्मराज बांगर यांनी खातरजमा केली. त्यात कोल्हेने तडजोडीअंती ८ हजारांची मागणी केली. शिवाय, कोल्हेने बिनीवालेला कॉल करून याबाबत विचारणादेखील केली. कोल्हेने पैसे घेतल्यावर खांद्यावरचा गमछा खाली उतरवण्याचा इशारा ठरला होता. ठरल्याप्रमाणे दुपारी ४ वाजता तक्रारदाराने कोल्हेच्या हातात पैसे टेकवले आणि गमछा उतरवला. तेथेच दबा धरून बसलेल्या गुसिंगे, बांगल, अंमलदार राजेंद्र नंदिले, युवराज हिवाळे, सी.एन. बागुल यांनी धाव घेत त्याला रंगेहाथ ताब्यात घेत बिनीवालेलादेखील अटक केली. दोघांवरही पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!