
Updated by ⭐ स्टार वन न्युज मराठी ™ ✍️
9 जुलै 2025
✒️बीडमध्ये पोलीस कर्मचारीच चोर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रीम 11, रमी ॲपमध्ये पैसे बुडाल्यामुळं लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केली आहे
Beed Crime News : बीडमध्ये पोलीस कर्मचारीच चोर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रीम 11, रमी ॲपमध्ये पैसे बुडाल्यामुळं लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केली आहे. यापूर्वी देखील या पोलिसाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच 58 बॅटऱ्यांची चोरी केली होती. अमित मधुकर सुतार असं त्याचं नाव असून ते बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.
-
दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी
2024 मध्ये इन्वर्टरसाठी लागणाऱ्या 10 बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी त्याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेला वर्ष उलटत नाही, तोच सुतार याने आणखी एक कारनामा करत दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आलं आहे.
-
बॅटरींची चोरी केल्यानंतर अमित सुतार यांचं केलं होतं निलंबन