ईगतपुरी तालुक्यातील विविध रस्त्यासाठी मनसेचे निवेदन आणि आंदोलनाचा इशारा.✍️ नाशिक प्रतिनिधी. ज्ञानेश्वर नाईकवाडी 📲 +919960425510
वार्ताहर ज्ञानेश्वर नाईकवाडी

Updated by स्टार वन न्युज मराठी ™

मो.+919960425510
नाशिक
ईगतपुरी तालुक्यातील पुर्व भागातील अनेक रस्त्याची अवस्था दैनिय झाली आहे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती झाली असुन प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे
त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण से
नेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता व जि.प. नाशिक विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता याची भेट घेऊन निवेदन देण्यात आले
अतिशय महत्त्वपूर्ण असलेले रस्ते आहे रोजची दळणवळण करणारा रस्ता आहे अनेक अपघातांना नागरिक बळी पडले आहेत याच रस्त्यावर शेतकरी,कामगार,शालेय विध्यार्थी कॉलेज चे विद्यार्थी अनेक प्रकारचे व्यवसायिक त्याचबरोबर नामवंत हॉस्पिटल असुन सर्व डॉक्टर सह पेशन्ट या रस्त्याचा वापर करत असतात मोठी ये जा या रोडवर होत असते परंतु याकडे प्रशासन सह आधिकारी लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष झाले आहे खालील प्रमाणे रस्ते
१} वि,टि,सी,फाटा ते साकुर फाटा २}मुढेगाव ते नांदगाव बु ३}वाडीवहे ते आहुर्ली ४}साकुर फाटा ते पिंपळगाव घाडगा, डुकरा ५}मुरंबी फाटा ते मुरंबी गाव ६}कु-हेगाव ते बेलगाव ७}मुकणे फाटा ते कॉलनी या सर्व रस्त्याची
येत्या १० तारखेपर्यंत जर रस्ताची डागडुजी केली नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून येत्या १५ ऑगस्ट रोजी नागरिकांना घेऊन खड्ड्यात उभे राहुन अदोलन करणार आहेत
✍️✍️काही विपरीत घडले तर त्याला प्रशासन व आधिकारी च जबाबदार रहातील असे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता व जि.परिषद विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे
त्यावेळी मनसेचे आत्माराम मते,गणेश मुसळे,समाधान शिंदे,संस्कार टिळे सह नागरिक उपस्थितीत होते




